एक्स्प्लोर

जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज : WHO

जगातील प्रत्येकी दहापैकी एक लोकांना कोरोनाची लागण झाली असण्य़ाचा 'सर्वोत्तम अंदाज' आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाच्य़ा प्रमुखांनी व्यक्त केले आहे. जगातील मोठी लोकसंख्या संकटात असल्याचेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले की त्यांचा 'सर्वोत्तम अंदाज' असे स्पष्ट करतो की जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 10 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असेल. ही संख्या सध्याच्या पुष्टी झालेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या 20 पटीने जास्त आहे. डॉ. मायकल रायन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळासमोर कोरोनाच्या प्रादुर्भावासंबंधी बोलत होते. ते म्हणाले की, ही संख्या ग्रामीण आणि शहरी भागात तसेच वेगवेगळ्य़ा गटात वेगवेगळी आहे. याचा अर्थ असा होतोय की जगातील बहुसंख्य लोकसंख्या संकटात आहे. ते म्हणाले की कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच जाणार आहे पण त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साधने उपलब्ध आहेत. आपण ती कशा पध्दतीने वापरतो यावर आता जगाचे भविष्य अवलंबून आहे. आत्तापर्यंत बऱ्याच मृत्यूंना आळा घालण्यात यश मिळाले आहे आणि यापूढेही अनेकांचे प्राण वाचवले जातील असे रायन म्हणाले. त्य़ा आधी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी या आजाराला बळी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली तसेच अनेकांचे प्राण वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. रायन पुढे म्हणाले की दक्षिण पूर्व आशियात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, युरोप आणि पूर्व भूमध्य भागात कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ होत आहे तर आफ्रिका आणि पश्चिम प्रशांत महासागर भागात परिस्थिती सकारात्मक आहे. आमचा सध्याचा सर्वात्तम अंदाज असे सांगतो की जगातील प्रत्येक दहा पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे., असे रायन यांनी कार्यकारी मंडळासमोर बोलताना सांगितले. कार्यकारी मंडळ हे जगातील अनेक देशांतील शासनांच्या प्रतिनिधींपासून बनले आहे. त्यांच्याद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला फंड उपलब्ध करून दिला जातो. जगातील एकुण 7.6 अब्ज लोकसंख्येपैकी 760 दशलक्ष लोकांना लागण झाल्याचं हा अंदाज आहे जो जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हापकिन विद्यापीठाच्या 35 दशलक्ष या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाची लागण झालेल्या खऱ्या आकडेवारीपेक्षा सध्याची सांगण्यात येणारी आकडेवारी ही खूप लहान आहे. गेल्या मे महिन्यात झालेल्या बैठकीचा आढावा घेताना आ्णि कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी डब्लूएचओची भूमिका काय आहे या विषयावरच्या चर्चेदरम्यान रायन यांनी हे मत व्यक्त केले. त्यावेळी ते असेही म्हणाले की जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोनाचे संक्रमण जगभर बऱ्याच भागात वाढताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget