एक्स्प्लोर

Buldhana : मुसळधार पावसाने लोणार तालुक्यातील चार गावाचा संपर्क तुटला, देवधाबा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

कोकण आणि मुंबईत दाखल झालेला मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. आगामी काळात पेरणीपूर्व कामांना गती मिळणार आहे.

बुलढाणाः राज्यभरासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच रविवारी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात झालेल्या मुसळधार  पावसाने लोणार तालुक्यातील सुरू असलेल्या पुलाच काम वाहून गेले आहे. त्यामुळे चार गावाचा संपर्क तुटला आहे. यासोबतच या मार्गावरील वळण रस्ताही वाहून गेल्याने कोनाटी, झोटिंगा, देऊळगाव कोळ, महार चिकना या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. काल दुपारी बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात काही ठिकाणी दाणादाण उडाली. वळण रस्ता वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहने जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. तर मलकापूर तालुक्यात झालेल्या पावसाने देवधाबा गावातील काही घरात पाणी शिरल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

देवधाबा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ.

काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील देवधाबा परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्याना पूर आला होता. यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगाडाटात आलेल्या पावसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह गुरांचीही फजिती झाली. या पावसाने शेतकरी मात्र सुखावला असून आगामी काळात पेरणीपूर्व कामांना गती मिळणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही दमदार हजेरी

कोकण आणि मुंबईत दाखल झालेला मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. काल मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रात 279 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्महापूरध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना दिलासा

मान्सूनपूर्व पावसाने पिकांची नासाडी; टोमॅटोचे भाव पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 September 2026: आज भाद्रपदाचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज भाद्रपदाचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
Success Story :  सलग सहा वेळा अपयश आलं, पण सातव्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं, लेफ्टनंट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, दोन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, दोन दिवस दारुची दुकाने राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget