एक्स्प्लोर

Harshvardhan Sapkal : पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती म्हणजे फडणवीसांना चपराक; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सूरू व्हावे म्हणून पानसरेंची बदली केली का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

Harshvardhan Sapkal बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आठवडाभरापूर्वी एका लग्न समारंभात बुलढाणा येथे आले होते आणि त्यानंतर आठवडाभरातच बुलढाण्याचे (Buldhana) कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विश्व पानसरे (Vishwa Pansare) यांची बदली झाली. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. विश्व पानसरे हे अवघे नऊ महिनेच जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय व योजनाही सुरू केल्यात. 

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवैध धंदे त्यांनी सर्वत्र बंद केले आणि त्यामुळेच की काय देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले आणि त्यांच्या कानात जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बद्दल सांगितले, आणि त्यानंतर विश्व पानसरे यांची बदली झाली. जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सुरू करण्यासाठीच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर केला आहे. मात्र विश्व पानसरे यांच्या बदलीला CAT ने स्थगिती दिल्यामुळे ही एक प्रकारे फडणवीसंना चपराकच बसल्याचं ही सपकाळ म्हणाले.

पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची नऊ महिन्याच्या कालावधीतच अमरावती येथे राज्य राखीव दलाच्या पथकात नुकतीच बदली झाली होती. मात्र या बदलीला आव्हान देत विश्व पानसरे यांनी CAT मध्ये याचिका केली होती. यावर तात्काळ सुनावणी घेत विश्व पानसरे यांच्या बुलढाणा येथून झालेल्या बदलीला कॅट ने स्थगिती दिली आहे. मात्र तत्पूर्वीच बुलढाणा येथे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे की निलेश तांबे? असा डेडलॉग सध्या तरी दिसत आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सूरू व्हावे म्हणून पानसरेंची बदली केली का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती म्हणजे फडणवीसांना चपराक असल्याची बोचरी टीका ही त्यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
Embed widget