(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! औरंगाबाद खंडपीठातील वकिलांकडून 'कामबंद आंदोलना'ची हाक
Sambhaji Nagar News: औरंगाबाद खंडपीठातील वकिलांकडून 'कामबंद आंदोलना' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
Work Strike By Lawyers in Aurangabad Bench: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठातील (Aurangabad Bench) वकिलांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. खंडपीठातील नव्या आणि जुन्या इमारतीमधील कामावरून हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. न्यायालयाचे काही कामकाज जुन्या इमारतीमध्ये तर काही कामकाज नवीन इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे सर्व कामकाज एकाच ठिकाणी करण्याची मागणी वकील संघाने केली होती. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने आजपासून वकील संघाकडून कामकाज बंदची हाक देण्यात आली आहे.
वकील संघाच्या मागणीनुसार, सध्या चालू असलेल्या जुन्या इमारतीमध्ये फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे कामकाज सध्याच्या जुन्या न्यायालयीन कक्षांमध्ये चालू ठेवण्यात यावेत. तसेच नव्या इमारतीमध्ये फौजदारी व दिवाणी न्यायालय रजिस्ट्रीचे कामकाज व सर्व ऑफिसेस स्थलांतरित करून दोन्ही इमारतीचे कामकाज चालू ठेवावे. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने वकिलांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
...तर दिवाणी आणि फौजदारी कामकाजात सहभागी न होण्याचा वकिलांचा निर्णय
फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू न झाल्यास 4 ऑक्टोबरपासून खंडपीठातील दिवाणी आणि फौजदारी कामकाजात वकिलांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या ठरावाची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आजपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नरसिंह एल. जाधव आणि सचिव अॅड. राधाकृष्ण के. इंगोले यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
जुनी ईमारत असतांना नवीन ईमारत तयार करण्यात आली आहे. जुन्या ईमारतमध्ये 15 कोर्टरूम असून त्यातील 4 कोर्टरूम खाली आहे. त्याठिकाणी बसण्यासाठी न्यायाधीश नाहीत. आता नवीन ईमारतमध्ये 12 कोर्टरूम बांधण्यात आले आहेत. ज्यात क्रिमिनलचे 5 कोर्टरूम स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच सिव्हील कोर्ट जुन्या ईमारतीत ठेवण्यात आले आहे. या दोन्ही ईमारतमध्ये पायी जाण्यासाठी किमान आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे एकाचवेळी वकिलाचे क्रिमिनल आणि सिव्हील प्रकरण असल्यास त्याने तिथे कसं उपस्थित राहावे, असा प्रश्न वकिलांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वच कोर्ट एकाच ठिकाणी ठेवावे अशी मागणी वकिलांची होती. मग ते जुन्या ईमारत मध्ये ठेवा किंवा नवीन ईमारतमध्ये ठेवा, पण एकाच ठिकाणी ते असले पाहिजे अशी मागणी वकील करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
घरात हनुमान चालीसा म्हटल्याने इतरांच्या भावना कशा दुखावतील?; खंडपीठाकडून गुन्हा रद्द करण्याचे आदेश