एक्स्प्लोर

Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?

Maharashtra Politics: मराठा समाजाला सगेसोयरे निकषात बसणारे आरक्षण द्यावे आणि हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावे, अशा दोन प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेशही जारी केला होता.

छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (OBC Reservation) आणि सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यावे, यावर ठाम आहेत. जरांगेंच्या या मागणीला लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी विरोध दर्शवत गेल्या काही महिन्यांमध्ये वाटण्यात आलेले बोगस कुणबी दाखले (Kunbi Certificates) रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाचा (Maratha Reservtion) मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले एक बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे. 

यापैकी एक बॅनर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात लावण्यात आला आहे. या माध्यमातून सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आला आहे. आर.बी. फाऊंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छूक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. 

फलकावर नेमकं काय लिहिलंय?

शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या ) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम 'सगेसोयरें' (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावली मधे चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण निती आणि आरक्षणा मागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करत आहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे.

आणखी वाचा

ज्या सग्यासोयऱ्यांसाठी मनोज जरांगेंनी हट्ट केला ते सगेसोयरे नेमके कोण? सरकारच्या जीआरमधील शब्द जसाच्या तसा! 

गिरीश महाजन म्हणतात, सगेसोयरे न्यायालयात टिकणार नाही, मग अध्यादेश का काढता? विजय वडेट्टीवारांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunanandan Lele T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेची काय आहेत बलस्थानं ?TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 6 AM: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Embed widget