मोठी बातमी! मराठवाड्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी आली समोर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या?
Marathwada Kunbi Records : मराठवाड्यात 3 हजार 462 कुणबी जात प्रमाणपत्र आतापर्यंत वाटप करण्यात आले आहेत.
![मोठी बातमी! मराठवाड्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी आली समोर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या? Marathwada Kunbi Entries Statistics total 28 thousand 862 Maratha Kunbi records found in Marathwada Manoj Jarange Maratha Reservation marathi news मोठी बातमी! मराठवाड्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी आली समोर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/6780b94fe2b9158d9bb4c0401e5470461703134465583737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीने (Shinde Committee) आपला दुसरा अहवाल देखील सरकारकडे सादर आहे. दरम्यान, मराठवाड्यात (Marathwada) आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदींची (Kunbi Records) संख्या खूपच कमी असल्याचे समोर येत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 2 कोटी दस्तऐवज तपासण्यात आले असून, ज्यातून आतापर्यंत एकूण 28 हजार 862 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात 3 हजार 462 कुणबी जात प्रमाणपत्र 1 नोव्हेंबरपासून आजवर देण्यात आली आहेत.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर 2 कोटी पुरावे शोधून, सुमारे 28 हजार 862 मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करीत आहे. तसेच, सध्या समितीला नोंदी पाठविण्याचे काम संपले आहे.
मराठवाडा जिल्हानिहाय कुणबी नोंदी
- संभाजीनगर 2337
- जालना 3318
- परभणी 2891
- हिंगोली 3515
- नांदेड 1204
- बीड 13128
- लातूर 901
- धाराशिव 1570
- एकूण : 28862
एका पुराव्याच्या आधारे सुमारे 20 जणांना प्रमाणपत्र मिळणार
मराठवाड्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 462 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय. तर, आठ जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने शोधलेल्या पुराव्याच्या आधारे मराठवाड्यातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करत आहे. एका पुराव्याच्या आधारे सुमारे 20 जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. तसेच रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
जरांगे यांची नाराजी...
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा मराठवाड्यातून सुरू केला. मात्र, त्याच मराठवाड्यात आत्तापर्यंत फक्त 28 हजार 862 कुणबी नोंदी आढळून आले आहे. त्यामुळे, यावरून मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा नोंदी शोधत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी याची दखल घेऊन मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरूच ठेवावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. पुढील तीन दिवसात सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सांगितलं. मात्र, मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीवर आपण ठाम असून, त्यानंतर मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठवाड्यातील मराठा समाजाची फसवणूक, 95 टक्के मराठे आरक्षणाच्या बाहेर राहणार; बाळासाहेब सराटेंचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)