एक्स्प्लोर

जायकवाडी 26.65 टक्के भरलं, मराठवाड्यातील उर्वरित धरणांची काय स्थिती?

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील काही धरणांमध्ये हळूहळू पाणीसाठा वाढतोय. पण अनेक धरणांना अजूनही पाण्याची प्रतीक्षाच आहे.

Jayakwadi Dam:  राज्यात ऑगस्ट महिन्यात मान्सूनची सर्वदूर हजरी लागली असून आता पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने मराठवाड्यातील धरणांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या 5 टक्क्यांवर असणारा जायकवाडीचा पाणीसाठा आता 26.65 टक्क्यांवर गेलाय.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 920 धरणांमध्ये सरासरी 25.94% पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 5.57 टक्क्यांची यंदा तूट दिसून येत आहे. राज्याच्या इतर 5 महसूल विभागांच्या तूलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा अजूनही सर्वात कमी असला तरी मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ होत आहे.

जायकवाडी धरणात 26.65 टक्के

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळु वाढ होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ८० टक्क्यांच्या वर गेला आहे. दरम्यान जिल्ह्यातील कालवे, धरणांमधून विसर्ग सुरु असून जायकवाडीकडे तब्बल  १५ टीएमसी पाणी गेले आहे.मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता १९.८२ टीएमसी झाले आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

मराठवाड्यातील इतर धरणांची काय स्थिती?

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निम्न दुधना धरण आता १० टक्के भरले असून ०.८६ टीएमसी पाण्याची नोंद झाली आहे. तसेच पूर्णा येलदरी धरणामध्ये ३३.२१ टक्के पाणीसाठा म्हणले ९.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.बीडचे माजलगाव धरण अजूनही शुन्यावर असून गतवर्षी १५.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता . तसेच मांजरा धरणात  २.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी २६.८५ टक्के धरण भरले होते. नांदेडचे उर्ध्व पैनगंगा धरण आता ५२.६२ टक्के भरलं असून नांदेडकरांना यंदा दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी हा पाणीसाठा ६३.६५ टक्के भरला होता. आता धरणात १७.९२ टीएमसी पाणीसाठा आहे.धाराशिवमध्ये यंदा जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. तेरणा धरण आता २९.३६ टक्क्यांवर भरले असून धाराशिवच्या गावांची तहान भागवणारे उजनी धरणही आता भरले असून धाराशिवकरांना यंदा दिलासा मिळालाय.

नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला 10 टीएमसी 

 जिल्ह्यातील धरणे साधारणतः तीन आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांतील मुसळधार पावसाने (Heavy rain) जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 37 हजार 585 दशलक्ष घनफूट म्हणजेच 57 टक्के जलसाठा झाला झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) देखील तुडूंब होण्याच्या मार्गावर आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील सुमारे आठ धरणांमधून विसर्ग सुरु होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला (Jayakwadi Dam) आतापर्यंत 10 टीएसी पाणी रवाना झाले असल्याने मराठवाड्याची (Marathwada) तहान भागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम
खोक्या भाईसाठी बीड पोलिसांचा बिर्याणीचा सुग्रास बेत, मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम अन् भेटीगाठी
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Kolhapur VIDEO : प्रशांत कोरटकराला घेऊन पोलीस कोल्हापुरात, आज सुनावणी होणार100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 7AmPrashant koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला, आज कोर्टात सुनावणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम
खोक्या भाईसाठी बीड पोलिसांचा बिर्याणीचा सुग्रास बेत, मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम अन् भेटीगाठी
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Embed widget