एक्स्प्लोर

Manoj Jarange Mumbai Rally : 10 लाख वाहनं, सोबतच पीठ-मीठ अन् तेल; असा असणार मनोज जरांगेंचा मुंबई दौरा

Manoj Jarange : या दौऱ्यात कोणती वाहनं असणार, जेवणाची सोय कशी असणार, मुंबईत राहण्याची सोय कशी असणार, तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोण कोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहे. दरम्यान, त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. या दौऱ्यात कोणती वाहनं असणार, जेवणाची सोय कशी असणार, मुंबईत राहण्याची सोय कशी असणार, तसेच मनोज जरांगेंच्या सोबत कोण कोणती लोक मुंबईच्या दिशेने निघणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं खुद्द मनोज जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिली आहे. 

दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली  सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून, दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपारिक खेळ आहे, असे खेळ आयोजित करण्यात येतील. आनंद उत्साहा करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत.

राहण्याची आणि खाण्याची अशी असणार व्यवस्था...

एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने जाणाऱ्या आंदोलकांची खाण्याची आणि राहण्याची कशी व्यवस्था असणार यावर देखील मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. "राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आम्ही घेऊन जात असलेल्या गाड्यात करणार आहोत. पाऊस आल्यास त्याच गाड्यात बसून स्वतःची सुरक्षा करणार आहोत. त्यामुळे, तुम्ही आम्हाला कसे अडवता पाहतो, असे जरांगे म्हणाले. 

मुंबईकडे जातांना तीन तुकड्या केल्या जाणार...

दरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी करायला सुरुवात झाली आहे. मुंबईकडे निघतांना तीन तुकड्या करण्यात येणार आहे. ज्यातील एका तुकडीत पिण्याच्या पाण्याची, डॉक्टर, जेवणाची सोय असणार आहे. सोबतच ढोल, हलक्या असे पारंपरिक गोष्टी देखील घेऊन आम्ही जाणार आहोत. आमच्यासोबत अंदाजे 10 लाख वाहनं असण्याची शक्यता आहे. सोबत ज्वारी, बाजरीचे पीठ असणार आहे. तसेच, साबण, तेल आणि कोलगेट आशा गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन निघणार आहोत. पाऊस असल्यास ताडपत्री सोबत असणार, असल्याचे जरांगे म्हणाले. 

मुंबई दौऱ्याचा खर्च कोण करणार...

या संपूर्ण मुंबई दौऱ्याचा खर्च आम्ही स्वतः करणार आहे. आम्ही शेतकरी असून कष्ट करतो. सर्व गावं मिळून खाण्याच्या गोष्टी जमा करून देणार आहे. गाड्याला लागणाऱ्या डिझेलचा खर्च देखील गावकरी एकत्र मिळून करणार आहेत. काही लोकं मुंबईत आणि काही गावात खिंड लढवणार आहे. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. पण आम्हाला आरक्षण देणार नसाल तर आम्हाला जावेच लागणार. शेवटची विनंती आहे सर्व नेत्यांना, हीच वेळ आहे मराठा समाजाला न्याय देण्याची. अन्यथा मराठा समाज तुम्हाला दारात उभं करणार नाही, असे जरांगे म्हणाले.

पोलिसांनी नोटीस दिल्याने मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढतेय...

मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही ट्रॅक्टर चालकांना नोटीसा देण्यात आले आहे. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याने  मुंबईकडे येणाऱ्या लोकांची आणखी संख्या वाढत आहेत. आमचा संबंध नसतांना आम्हाला नोटीस दिली जात आहे म्हणत न येणारी लोकं देखील मुंबईला येण्यासाठी तयारी करतायत, असे जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना मी अंगावर घेऊ का? असे जमणार नाही; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंनी नाकारला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget