धक्कादायक! अभ्यासावरुन वडील रागवले, मुलाने उचलले टोकाचे पाऊल, सुसाईड नोटही लिहून ठेवली
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केली आहे. मुलाला अभ्यासावरुन वडील रागावल्यामुळे या युवकाने सुसाईड नोट (Suicide Note) लिहून गळफास घेतला. ही घटना सोमवारी (27 फेब्रुवारी) रात्री गारखेडा परिसरातील स्वानंदनगर भागात घडली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शार्दूल शंकर कोपळकर (वय 17 वर्षे, रा. रेणुका इनक्लेव्ह, स्वानंदनगर) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे.
दरम्यान याबाबत जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा देवगिरी महाविद्यालयात अकरावीच्या कॉमर्सच्या वर्गात शिक्षण घेत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. दरम्यान सोमवारी रात्री त्यास वडील रागावले. वडील आपल्यावर रागावल्यामुळे याचा अमोलला राग आला होता. तर रागाच्या भरात त्याने गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शार्दूलचे वडील बांधकाम कामगारांचा पुरवठा करणारे ठेकेदार आहेत. त्यांना शार्दूलशिवाय दोन मोठ्या मुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मला माफ करा
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी अमोलने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये त्याने "सॉरी आई- बाबा, मला माफ करा," असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याशिवाय आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, असेही चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पोलिसांकडून या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
तरुणाचा संशयास्पद मृत्यू
वडील रागावल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली असतानाच, छत्रपती संभाजीनगर शहरातून खामगाव येथे गेलेल्या एका तरुण चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची देखील घटना समोर आली आहे. अमोल सुरेश अस्तुरे (वय 34 वर्षे, रा. पिसादेवी रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमोलच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान अमोल हा 20 फेब्रुवारी रोजी खामगाव येथे शहरातून फळं घेऊन गेला होता. तेथे ऑर्डर मागवणारे मजूर फळं गाडीतून उतरवीत असताना, अमोल त्यांना मी जेवण करुन येतो, म्हणून गेला. मात्र त्यानंतर, तो खामगाव सरकारी दवाखान्यात दाखल झाला. व्यापाऱ्यांनी आणि खामगाव पोलिसांनी फोनवर माहिती दिली. नातेवाईकांनी खामगावला जाऊन पाहिले असता, अमोलच्या डोक्यावर गंभीर दुखापत होती. नातेवाईकांनी अमोलला घाटी रुग्णालयात हलवले. परंतु उपचार सुरु असताना मंगळवारी (28 फेब्रुवारी) सकाळी त्याचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Facebook Account : तुमच्या बनावट फेसबुक खात्याचा असा घ्या शोध; सायबर पोलिसांनी दिली माहिती