Chhatrapati Sambhaji Nagar: पेटवलेल्या कचऱ्यातील बाटलीचा स्फोट, मुलगा गंभीर भाजला; पोलिसात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar News : ही घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील गारखेडा परिसरात घडली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: आपल्या घराच्या परिसरात असलेला कचरा पेटवणे एका महिलेला चांगलाच महागात पडलं असून, यामुळे एक मुलगा जखमीदेखील झाला आहे. अपार्टमेंटच्या सामायिक गार्डनमध्ये पेटवलेल्या कचऱ्यातील बाटलीचा स्फोट होऊन एक 11 वर्षीय मुलगा भाजला असल्याचे समोर आले आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील गारखेडा परिसरात घडली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अर्णव अभय देशमुख असे जखमी मुलाचे नाव आहे. तर पुंडलिकनगर पोलीस पुढील तपास करतायत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्णवची आई अपर्णा अभय देशमुख (वय 33 वर्षे, रा. मयूर टेरेस, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 6 मार्च रोजी दुपारी एक वाजता वंदना गणेश मुळे यांनी अपार्टमेंटच्या सामायिक गार्डनमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटवला होता. त्यांनी पेटवलेल्या काचऱ्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या होत्या. दरम्यान आगीमुळे यातील एका बाटलीचा स्फोट होऊन ती वर उडाली. तीच बाटली अर्णवच्या मानेवर पडली. पेटलेले प्लॅस्टिक मानेवर पडल्याने तो भाजला. त्याला गंभीर स्वरुपाची जखम झाली. त्याच्या चेहऱ्यावरही जखम झाली आहे. त्यामुळे पर्णा अभय देशमुख यांच्या फिर्यादीवरून वंदना मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राठोड करीत आहेत.
किरकोळ भांडणाच्या कारणावरुन चाकू हल्ला
दुसऱ्या एका घटनेत लग्नात झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन एका कुटुंबातील सदस्यांवर चाकू हल्ला केला आहे. ज्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. तर या प्रकरणी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय हरिभाऊ ढवळे (वय 38 वर्षे, भाटनगर नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, आकाश अजब मंडाळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय ढवळे व आकाश मंडाळे हे एकाच गल्लीत राहतात. दरम्यान मंडाळे यांनी लग्नात झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन विजय ढवळे यांच्यासह त्यांच्या पत्नी व साला तन विनायक गोंडे (वय 26 वर्षे) यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तिघांना हाताचापटाने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच घरातुन चाकु आणला व विजय ढवळे यांच्या मानेजवळ व छातीवर डावे बाजुस मारुन जखमी केले. तसेच ढवळे यांच्या पत्नीच्या उजव्या हातावर धारदार वस्तुने मारुन जखमी केले. तसेच ढवळे यांच्या साल्याच्या डाव्या डोळ्याचे वर, कपाळावर बुक्का मारला. ज्यात तिघेही जखमी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू