एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी पाटीलचा नादच खुळा; एक अदा पाहण्यासाठी लोटलेल्या गर्दीमुळे पत्र्याचे शेड कोसळले

Gautami Patil show : शेड कोसळताच गौतमी पाटीलने नृत्य थांबवत कार्यक्रम गुंडाळला.

Gautami Patil show : अवघ्या काही दिवसात राज्यात प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil)  कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो. आता असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील महालगावात समोर आला आहे. कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या गौतमी पाटीलची एक अदा पाहण्यासाठी लोटलेल्या गर्दीमुळे एका दुकानाचे पत्र्याचे शेड कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरीही काही जण मात्र जखमी झाले आहेत. तर शेड कोसळताच गौतमी पाटीलने नृत्य थांबवत कार्यक्रम गुंडाळला. तर या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका कापड दुकानाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. दुपारी स्थानिक राजकीय पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला होता. तर सायंकाळी लावणी कलाकार गौतमी पाटील ही फीत कापून व तीन गाण्यांवर आपली कला सादर करणार होती. दरम्यान सोशल मीडियातून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्याने परिसरातील युवक व नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

दुकानाच्या बाजूलाच तिला नृत्य करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्याच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका दुकानासमोर पत्र्याचे शेड होते. रस्त्यावर जागा नसल्याने काही बहाद्दर थेट या शेडवर जाऊन बसले. दुसरे नृत्य सुरू असतानाच क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे हा शेडच कोसळला. त्यामुळे नृत्य पाहण्यासाठी बसलेलेही खाली पडले. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. समोरील शेड पडताच गौतमी यांनी आपले ताबडतोब नृत्य थांबवत कार्यक्रम गुंडाळून घेतला. तर शेडवरून खाली कोसळलेले उठून पसार झाले.

व्हिडिओ व्हायरल... 

गौतमी पाटीलच्या लावणीची सद्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात होणारी गर्दी लक्षवेधी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी गर्दीमुळे होणाऱ्या राड्याची देखील तेवढीच चर्चा आहे. दरम्यान संभाजीनगरच्या महालगावाच्या कार्यक्रमात देखील गौतमीच्या कार्यक्रमात मोठी गर्दी झाली. बसण्यासाठी जागा नसल्याने तरुण थेट समोर असलेल्या दुकानाचे पत्र्याचे शेडवर जाऊन बसले. मात्र गर्दी अधिक झाल्याने हा शेड अचानक कोसळला. या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Gautami Patil Video : गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चढले दुकानाच्या शेडवर, शेड कोसळून गोंधळ

इतर महत्वाच्या बातम्या:

Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणारा ताब्यात; पुणे पोलिसांना मोठं यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget