एक्स्प्लोर

Ajit Pawar : महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा, विधानसभा एकत्रित लढणार; अजित पवारांचा वज्रमुठ सभेतून निर्धार

महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार आहोत. महाराष्ट्रावर संकट आल्यास मराठी माणूस पेटून उठतो. या भाषणानंतर कार्यकर्ते योग्य संदेश घेऊन जातील, यामध्ये शंका नसल्याचे ते म्हणाले.

Ajit Pawar : महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार आहोत. महाराष्ट्रावर संकट आल्यास मराठी माणूस पेटून उठतो. या भाषणानंतर कार्यकर्ते योग्य संदेश घेऊन जातील, यामध्ये शंका नाही . महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाविकास आघडीची सभा घेणार होतो, मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार आहे. सरकार पाडण्याचा केविलावणा प्रयत्न झाला. असे होत राहिल्यास तर स्थिरता राहणार नाही, ते राज्याला परवडणार नाही. उद्योगधंदे येणार नाही. प्रशासनाला विश्वास राहणार नाही त्यामुळे ते चांगलं काम करणार नाहीत.  निवडणूक आयोगही असं निर्णय देत असल्यास कस होणार? न्यायदेवता न्याय देईल, अशी भावना आहे.  

त्यावेळी दातखिळी बसली होती का?

अजित पवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मुख्यमंत्री13 मिनिटे देतात. एवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता.  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखील बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली. 

महागाई बेरोजगारी वरून लक्ष हटविण्यासाठी घटना 

अजित पवार म्हणाले की, राज्यात उद्योग येणार होते, पण यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना दिली? कांदा अनुदान जाहीर केले पण अटी घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढता, तुमच्यात धमक असले तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी घटना घडत आहेत. महाविकास आघडीची सभा होऊ नये म्हणून घटना घडल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget