एक्स्प्लोर

Ajit Pawar : त्यावेळी दातखिळी बसली होती का? सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अजित पवारांचा हल्लाबोल

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखिळी बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, आपल्या राज्यातील महापुरुषांचा राज्यपालांकडून अपमान होत असताना दातखिळी बसली होती का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, संविधानचा आदर सर्वानी केला पाहिजे, पण त्याला तिलांजली दिली. राज्य सरकार पडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, ही स्थिती देशाला परवडणार नाही. उद्योग येणार नाही, प्रशासन ही व्यवस्थित चालणार नाही. निवडणूक आयोग असे निर्णय कसे देतो हा प्रश्न आहे. न्याय देवतेवर आपला विश्वास आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मराठवाडा साधू संतांची भूमी आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मुख्यमंत्री13 मिनिटे देतात ऐवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करतात. 

राज्यात उद्योग येणार होते, यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना दिली. कांदा अनुदान जाहीर केले, पण अटी घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढतात, तुमच्यात धमक असल्यास सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई बेरोजगारी वरून लक्ष हटविण्यासाठी घटना घडत आहेत. महाविकास आघडीची सभा होऊ नये म्हणून घटना घडल्या. 

राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार

अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार आहोत. महाराष्ट्रावर संकट आल्यास मराठी माणूस पेटून उठतो. या भाषणानंतर कार्यकर्ते योग्य संदेश घेऊन जातील, यामध्ये शंका नाही . महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाविकास आघडीची सभा घेणार होतो, मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार आहे. सरकार पाडण्याचा केविलावणा प्रयत्न झाला. असे होत राहिल्यास तर स्थिरता राहणार नाही, ते राज्याला परवडणार नाही. उद्योगधंदे येणार नाही. प्रशासनाला विश्वास राहणार नाही त्यामुळे ते चांगलं काम करणार नाहीत.  निवडणूक आयोगही असं निर्णय देत असल्यास कस होणार? न्यायदेवता न्याय देईल, अशी भावना आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 12 जखमी, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Embed widget