(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : "राज्यात काँग्रेसपेक्षा MIM मोठा पक्ष, आतातरी आघाडीचा विचार करा"; इम्तियाज जलील यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला पुन्हा प्रस्ताव
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम (MIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) युती करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत आघाडीचा विचार करावा, असा प्रस्ताव एबीपी माझाशी बोलताना जलील यांनी दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्यावर्षी आमचा एक खासदार होता आणि काँग्रेसचा देखील एकच खासदार होते. आता काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रत नाही.राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आघाडीचा विचार करावा. आम्ही युतीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आता आमच्यात युती होणार नसल्याचे अनेकदा सांगितले आहेत. त्यामुळे आम्ही आता त्याच्याकडे पुन्हा जाणार नाही.
भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं : इम्तियाज जलील
आमच्यावर भाजप बी टीमचा आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना युतीची ऑफर आम्ही दिली होती. त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी ही ऑफर अजूनही कायम आहे. भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्यासाठी माझी अजूनही ऑफर आहे. त्यांनी यासाठी विचार करावा. महाविकास आघाडीची युती कशी आहे त्यावर तिन्ही पक्षांनी विचार करावा. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचं की नाही यावर त्यांनी निर्णय घ्यावा. तसेच महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर नक्की विचार करू. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.
एमआयएमच्या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. कारण औरंगाबादमध्ये एमआयएम आणि शिवसेना कायम एकमेकांचे विरोधक राहिले आहेत. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून विरोधकांकडून शिवसनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात एमआयएमसोबत आघाडी करण्यासाठी शिवसेना तयार होईल का? शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे लक्ष आहे.
हे ही वाचा :