एक्स्प्लोर
शिष्टमंडळाच्या दौऱ्याचा आजचा मुहूर्त देखील हुकला; जरांगे म्हणतात आता थेटच बोलणार
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असून, आजचा दिवस वाढवून देण्याची मागणी केली आहे. उद्या 100 टक्के शिष्टमंडळ येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. जर आज आले नाही तर यावर उद्या थेट बोलणार आहे. सरकार जोरात काम करत आहे. जिल्ह्यात विशेष कक्ष सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत नाही. मात्र, आम्ही देखील आमची तयारी केली आहे.
फडणवीस आज शहरात येणार असल्याच्या प्रश्नावर बोलतांना जरांगे म्हणाले की, कोणी भेटायला आले किंवा नाही आले तरीही आमचे काम सुरु आहे. आम्ही कामाला लागलो असून, आरक्षण मिळवून राहणार आहे. भेटायला यावं किंवा नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचे जरांगे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement