पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध, पतीने उचललं टोकाचे पाऊल; औरंगाबाद सिल्लोडमधील धक्कादायक घटना
Aurangabad Suicide News : मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Suicide News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सिल्लोड शहरातील राजावाडी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप गंगाराम आरके (वय 42 वर्ष राजावाडी) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, प्रदीप आरके यांच्या पत्नीचे गावातील एकासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्यांना संशय होता. या प्रेमसंबंधाची माहिती प्रदीप यांना भेटली असता, त्यांनी त्यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनीही त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रदीप यांनी स्वतःहून आज शेतामध्ये जाऊन गळफास घेतली असल्याचं, त्यांचा भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे, या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल...
फिर्यादी जगन्नाथ गंगाराम आरके यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आज रोजी तक्रार दिली की, मयत प्रदीप गंगाराम आरके यांनी आपल्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप यांच्या पत्नीचे प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती मयत प्रदीप आरके यांना माहित झाल्यावर त्यांनी पत्नीसह पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या दोघांनी प्रदीपला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नीने वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे, प्रदीप आरके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तरुणाची आत्महत्या...
दुसऱ्या एका घटनेत विषारी द्रव प्राशन करून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कन्नड तालुक्यातील टाकळी अंतूर येथे घडली आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय 34 वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजू गायकवाड याने शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही घटना कुटुंबाच्या लक्षात येताच नातेवाइकांच्या मदतीने त्यांनी राजू गायकवाड यांना औरंगाबाद येथील घाटी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी राजू याला तपासून मृत घोषित केले. राजू याने आत्महत्या केल्याच्या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर, त्याच्या आत्महत्याबाबत अधिकृत कोणतेही कारण समजू शकले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या; परिसरात खळबळ