(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना नामांतराचा निर्णय घेण्याचा अधिकार होता का? मुख्यमंत्री शिंदेंचा थेट हल्लाबोल
CM Eknath Shinde : अल्पमतात सरकार असल्यावर असे निर्णय घेता येत नसून, ते बेकायदेशीर असल्याचं शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, याच निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. "नामांतराचा निर्णय आम्ही घेतल्याचा सांगत असलेल्यांना कॅबिनेट घेण्याचा अधिकार होता का? अल्पमतात सरकार असल्यावर असे निर्णय घेता येत नसून, ते बेकायदेशीर असल्याचं शिंदे म्हणाले. तर, आमच्या सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे म्हणाले.
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही लोकं सांगत आहे की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला होता. परंतु, अशी कॅबिनेट घेण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. सरकार अल्पमतात असल्याने असे निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. मात्र, आमच्या सरकारने अधिकृतरीत्या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी शेवटच्या बैठकीत घेतला होता निर्णय...
महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेत बंडखोरी झाली.एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडाची भूमिका घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शेवटची कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सरकार पडलं. पुढे शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलं. त्यामुळे या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकमध्ये उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द केला. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.
नामकरण फलकाचे अनावरण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीचे योजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री शहरात आले होते. दरम्यान, स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसुली विभाग, जिल्हा, तालुका, गाव या नामकरण फलकाचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषामुळे परिसर दुमदुमला असल्याचे पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathwada Cabinet Meeting : नव्या बाटलीत जुनीच दारू, सरकारच्या घोषणांवरून अंबादास दानवेंची टीका