(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगर : मलकापूर अर्बन बँकेत आणखी एक घोटाळा उघडकीस; चलाखी केलेल्या भाजप पदाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या
छत्रपती संभाजीनगर : याप्रकरणी गुन्हे शाखेने तत्काळ दोन आरोपींना अटक केली आहे. अभिषेक जगदीश जैस्वाल आणि अमरिश जगदीश जैस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगर : घोटाळ्यामुळे आरबीआयने निर्बध घातल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेत आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करीत 9 कोटींचे कर्ज उचलल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने तत्काळ दोन आरोपींना अटक केली आहे. अभिषेक जगदीश जैस्वाल आणि अमरिश जगदीश जैस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अभिषेक जैस्वाल भाजप पदाधिकारी
अभिषेक जैस्वाल भाजप पदाधिकारी आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींनी कर्ज काढल्यावर कुणालाही कानोकान खबर लागू दिली नाही, पण जेव्हा कर्जाचा भरणा झाला नाही, त्यावेळी बँकेने जप्तीची नोटीस काढल्यावर बँकेने कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली असता हा घोटाळा लक्षात आला.
जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करत नऊ कोटींचं कर्ज
दरम्यान, घोटाळ्यामुळे निर्बंध घालण्यात आल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार पैसा अडकल्याने हवालदिल झाले आहेत. खातेदारांचे शेकडो कोटी या बँकेमध्ये अडकल्याने खातेदारांना करायच तरी काय? असा प्रश्न पडला आहे. असे असतानाच हा बनावटपणा समोर आला आहे. या बँकेतून जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करत नऊ कोटींचं कर्ज घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अभिषेक जयस्वाल आणि अमरीश जयस्वाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक जयस्वाल हा भाजपचा पदाधिकारी असून जिल्हा बँकेचा संचालक आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक आणि इतरांचा सुद्धा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या