एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : जमिनीच्या वादातून मुलानेच केली सावत्र आईची हत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Crime News : पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या सावत्र आईला बेदम मारहाण करून तिची हत्या (Murder) केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर स्वतः विहिरित उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केला. मात्र परिसरतील नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वैजापूर तालुक्यातील आगरसायगाव येथे शनिवारी (1 जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतवस्तीवर घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाई घमाजी जाधव (वय 48 वर्षे. रा. अगरसायगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. तर नानासाहेब घमाजी जाधव (वय 33 वर्षे, रा. अगरसायगाव) असे आरोपीचे नाव आहे. 

वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र मुलाने आईचा खून केल्याचा खळबळ जनक प्रकार सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून नानासाहेब याने आज सकाळी साडेअकरा वाजता, विळ्याने आशाबाई यांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. ज्यात आशाबाई या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी  नानासाहेब याला ताब्यात घेतले. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. 

जमिनीचा वाद विकोपाला...

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नानासाहेब हा आशाबाई यांचा सावत्र मुलगा होता. दरम्यान त्यांच्यात जमनीवरून वाद होत होते. तर आज सकाळी पुन्हा दोघांमध्ये यावरून वाद सुरु झाला. या वादात सुरवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. पण हा वाद आणखीनच वाढत गेला. सावत्र आईचे शब्द नानासाहेबाच्या मनाला लागले आणि त्याला प्रचंड राग आला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने विळ्याने आशाबाई यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. जोरजोरात वार केल्याने आशाबाई यात गंभीर जखमी झाल्या. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नानासाहेबला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : फडणवीस कार्यक्रमातून जाताच पेट्यांची पळवा-पळवी; उपस्थित स्वयंसेवकांकडून 'लाभार्थ्यांना' लाठ्यांचा प्रसाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगVidarbha Vidhansabha Election : विदर्भात काँग्रेसच्या जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावाABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
"मी माझ्या बायकोला 'या' सुपरस्टारसोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडलं"; सेलिब्रिटीचा आत्मचरित्रात खळबळजनक दावा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Embed widget