एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, दोन ट्रकच्या अपघातात तब्बल 6 कारांचा चुराडा
Chhatrapati Sambhaji Nagar accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र अपघात पाहायला मिळाला आहे. वेरूळ येथे दोन ट्रकच्या अपघातात तब्बल 6 कारांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात अपघातग्रस्त दोन चारचाकी गाड्यांमधील भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतेही जीवित हानी झाली नसली तरीही अपघातग्रस्त गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज पहाटेच्या सुमारास वेरूळ ते खुलताबाद जाणाऱ्या रोडवरील घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. दरम्यान, यावेळी रस्त्यालगत पहाटेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उभ्या गाड्यांवर दोन्ही ट्रक पलटी झाल्या. ज्यात, तब्बल 6 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. त्यामधील दोन गाड्यांमधील काही भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement