एक्स्प्लोर
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरातील रिक्षा चालकांकडून अचानक 'चक्का जाम'
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रिक्षा चालकांकडून अचानक 'चक्का जाम' करण्यात आला आहे. पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर शहरातील रिक्षा चालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी धक्काबुक्की करून, दादागिरी केल्याच्या रिक्षा संघटनांकडून आरोप करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील टी पॉइंट येथे ही घटना घडली असून, त्यानंतर शहरातील रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील रिक्षा चालकांनी चक्का जाम करून, रिक्षा बंद ठेवल्या आहेत. अचानक झालेल्या या आंदोलनाचा आता प्रवाशांना फटका बसतांना पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement