एक्स्प्लोर

Aurangabad : पोलिसांनी चांगल्या वर्तणुकीची संधी दिली, पण बदल झाला नाही; आता थेट कारागृहात रवानगी

Aurangabad : एका गुन्हेगाराची थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, एकाला 15 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील दखलपात्र तसेच अदखलपात्र गुन्ह्यातील व्यक्तीविरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाई अंतर्गत अशा व्यक्तीकडून चांगल्या वर्तणुकीचे विशिष्ट मुदतीचे अंतिम बंधपत्र घेण्यात येते. जेणेकरून या व्यक्तीकडून पुन्हा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडणार नाही किंवा सामाजिक सलोख्यास बाधा पोहचणार नाही. परंतु, या स्वरुपाचे अंतिम बंधपत्राचे अटीचे भंग करून उल्लंघन केलेल्या व्यक्तींच्या विरूध्द आता पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया कठोर यांनी सक्त कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अशाच एका गुन्हेगाराची थेट हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, एकाला 15 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस ठाणे फुलंब्री हद्यीतील साजेद उर्फ गुड्डु जावेद शेख (वय 31 रा. राठी फुलंब्री रोड, धनगर गल्ली झोपडपट्टी फुलंब्री ता फुलंब्री जि औरंगाबाद) याचे वाढते गुन्हेगारी व धोकादायक कारवाईची गंभीर दखल घेऊन त्याचेविरुध्द कलम 110 (),() सीआरपीसी प्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या न्यायालयात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. यावेळी साजेद शेख याच्याकडून चांगले वर्तन ठेवून सार्वजनिक शांतता राखणे बाबत त्यांने हमी दिल्याने, त्याचेकडून दोन वर्षे कालावधीकरीता चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र कलम 117 क्रि.प्रो. कोड प्रमाणे अंतिम बंधपत्र (फायनल बॉंन्ड) घेण्यात आले होते.

दरम्यान, साजेद उर्फ गुड्डु जावेद शेख याचा बंधपत्राचा कालावधी संपण्याच्या आत दिनांक 20 मे रोजी काहिही कारण नसतांना त्यांने वानेगाव येथील एका सामान्य नागरिकास फोन कॉल करुन घराबाहेर बोलावून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साजेदवर प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याच्या वर्तनात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या याच कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्याची रवानगी हर्सुल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

अशांतता पसरविणाऱ्या कोणत्याही इसमांची गय केली जाणार नाही...

याचप्रमाणे, पोलीस ठाणे पिशोर हद्यीतील अशोक राजेंद्र हाडोळे (वय 21 वर्षे रा. करंजखेडा ता. कन्नड) याच्या विरुध्द पूर्वी दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. तसेच, दोन वर्षे कालावधीकरीता सार्वजनिक शांतता राखणे बाबत चांगल्या वर्तणुकीचे दिलेले बंधपत्राचे अटी व नियमांचे भंग केल्यामुळे त्यास 15 हजाराचा दंड ठोठावून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. त्यामुळे, चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राचे उल्लंघन करुन सामाजिक सलोखा, अगर अशांतता पसरविणाऱ्या कोणत्याही इसमांची गय केली जाणार नसुन, अशा व्यक्ती विरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad: आता भाऊ-दादांची खैर नाही, पोलिसांनी बनवली यादी; थेट घरात घुसून करणार कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Devendra Fadnavis : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
Multibagger Stocks : 6 रुपयांचा शेअर 1600 रुपयांपर्यंत पोहोचला,43  हजारांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश, ब्रोकरेज फर्मकडून मोठी अपडेट
6 रुपयांचा शेअर 1600 पर्यंत पोहोचला, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, मल्टीबॅगर स्टॉकचा दमदार परतावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरेNagpur Curfew Update | नागपूरमध्ये 4 ठिकाणी संचारबंदी कायम, तर काही भागात दिलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाईमचा पगार देणार; त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात?
Devendra Fadnavis : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....
Multibagger Stocks : 6 रुपयांचा शेअर 1600 रुपयांपर्यंत पोहोचला,43  हजारांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश, ब्रोकरेज फर्मकडून मोठी अपडेट
6 रुपयांचा शेअर 1600 पर्यंत पोहोचला, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, मल्टीबॅगर स्टॉकचा दमदार परतावा
Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात, पाहा फोटो
पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात आग, स्थापनेवेळी उभारलेलं कार्यालय आगीत भस्मसात
Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Raigad Crime : रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
रायगडमध्ये संतापजनक घटना, 80 वर्षांच्या थेरड्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चॉकलेटचं आमिष दाखवून राक्षसी कृत्य
Embed widget