(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : इंदुरीकर महाराजांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका, पुत्र प्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार
Chhatrapati Sambhaji Nagar : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दणका दिला आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा (FIR) दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते अस वक्तव्य केलं होत. मात्र त्यांचं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाला याचिककर्त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.
कलम - 22 , गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा
अमुकतमुक केल्यानं मुलगा किंवा मुलगी होईल, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची जाहीरात किंवा प्रचार हा गुन्हा ठरतो. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड या शिक्षा होऊ शकतात.
हेही वाचा