एक्स्प्लोर

Marathwada Cabinet Meeting : नव्या बाटलीत जुनीच दारू, सरकारच्या घोषणांवरून अंबादास दानवेंची टीका

Ambadas Danve : मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Marathwada Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाखांची घोषणा केली आहे. सोबतच 14 हजार कोटी नदीजोड प्रकल्पासाठी केले आहे. दरम्यान, याच मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 40 मिनिटांच्या बैठकीसाठी इतका खर्च ककरण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जुन्याच घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहेत. नव्या बाटलीत जुनीच दारू, अशा या घोषणा असल्याचं दानवे म्हणाले आहेत. 

दरम्यान यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, 40 मिनिटांच्या मीटिंगसाठी इतका खर्च केला. मागच्यावेळी 40 हजार कोटीच्या घोषणा केल्या होत्या, आता 45 हजार कोटीच्या घोषणा करण्यात आल्या आहे. एकच कागद तिघांनी वाचून दाखवला. मराठवाडा वॉटर ग्रीडचा उद्धव ठाकरे यांनी खून केल्याचा आरोप करण्यात आला. पण, तुम्ही तर मराठवाड्याच्या अपेक्षांचाच खून केला आहे. फक्त थापा मारण्यात आल्या आहेत.  मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. मागच्या सरकारवर टीका करतात, पण त्याच सरकारमध्ये शिवसेनेचे एक नंबरचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार होते. मग मागच्या सरकारच्या निर्णयाला ते जबाबदार नाहीत का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. 

एनडीआरएफच्या दुप्पटीने आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. एवढच नाही तर जनावरे, मालमत्ता नुकसान यासाठी देखील ही घोषणा करण्यात आली. पण, दुपटीने तर सोडा एनडीआरएफच्या मूळ नियमानुसार देखील सरकारने मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही. तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 4 हजार कोटींची घोषणा केली होती. याबाबत कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देखील ही घोषणा करण्यात आली. 37 कोटींचे नुकसान झाले असतांना 11 कोटीची घोषणा झाली. पण उरलेल्या नुकसानभरपाईचे काय झाले? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. 

कोणत्या विभागाला किती निधी? 

सात वर्षांनी आज मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात सर्वाधिक 21 हजार कोटी 24 लाखाची घोषणा जलसंपदा विभागासाठी करण्यात आली आहे. सोबतच सार्वजनिक बांधकाम 12 हजार 937 कोटी 85 लाख, पशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय 3 हजार 318 कोटी 54 लाख, नियोजन 1 हजार 608 कोटी 28 लाख, परिवहन 1 हजार 128 कोटी 69 लाख, ग्रामविकास 1 हजार 291 कोटी 44 लाख, कृषी विभाग 709 कोटी 49 लाख,  क्रीडा विभाग 696 कोटी 38 लाख, गृह 684  कोटी 45 लाख,  वैद्यकीय शिक्षण 498 कोटी 6 लाख, महिला व बाल विकास 686  कोटी 88 लाख, शालेय शिक्षण 400  कोटी 78 लाख, सार्वजनिक आरोग्य 374 कोटी 91 लाख, सामान्य प्रशासन 286 कोटी, नगरविकास 281 कोटी 71 लाख , सांस्कृतिक कार्य 253 कोटी 70 लाख, पर्यटन 95 कोटी 25 लाख, मदत पुनर्वसन: 88 कोटी 72 लाख, वन विभाग 65 कोटी 42 लाख, महसूल विभाग 63 कोटी 68  लाख, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी व न्याय 3  कोटी 85 लाख

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्यातील पहिल्या कॅबिनेटमध्ये 20 धडाकेबाज निर्णय, 59 हजार कोटींची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget