Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू
Accident : विशेष म्हणजे हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.
![Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar The series of accidents continues on Samriddhi Highway One death in two truck accident Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/15/2620d7310c08ef8a6e09de6e6ec384861678867711275443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असून, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्राथमिक माहितीनुसार ट्रक समृद्धी महामार्गावरुन कांदा घेऊन जात होता, त्यावेळी हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका पाहायाला मिळत आहे. दरम्यान आता आणखी एक भीषण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आला आहे. कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दुसऱ्या एका ट्रकसोबत अपघात झाला. ज्यात कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. तर अपघातानंतर दोन्ही ट्रक अक्षरशः महामार्गाच्या कडेला असलेलं बॅरेकेड तोडून गेले होते. दरम्यान याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील बचाव पथकाने धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात हलवले.
अपघातात 6 जणांचा मृत्यू....
दरम्यान गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका कुटुंबाचे बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हे कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याहून शेगावकडे निघाले होते. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉजवळील समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर या अपघातातील मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.
समृद्धी महामार्गावर चोरांची दहशत...
एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असताना, आता चोरांची दहशत पाहायला मिळत आहे. कारण वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. यावेळी एकूण तीन वाहनांवर दगडफेक करण्यात आला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :
कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; छ. संभाजीनगरमध्ये 15 रुग्ण आढळले, चाचण्या परत सुरु होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)