Ganesh Visarjan Chhatrapati Sambhajinagar : गणेश विसर्जन, छत्रपती संभाजीनगर शहरातील 'हे' मार्ग पूर्णपणे बंद राहणार
Ganesh Visarjan Chhatrapati Sambhajinagar : सकाळी 7 वाजेपासून तर गणेश विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

छत्रपती संभाजीनगर : 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या गुरुवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त असणार आहे. सोबतच, उद्या शहरातील गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही विशिष्ट मार्ग उद्या बंद असणार आहे. सकाळी 7 वाजेपासून तर गणेश विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तर, मिरवणुक मार्गावर भाविक व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन, नागरिकांच्या सुरक्षितता, जिवीतास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून हे बदल करण्यात आले आहेत.
वाहनांसाठी बंद राहणारे मार्ग...
(संस्थान गणपती ते बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.)
- सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट.
- जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट- मोंढा ते राजाबाजार.
- निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
- भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन..
- चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
- लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
- कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पुर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
- सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
- बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
- सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
- सावरकर चौक, एम. पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/ बळवंत वाचनालय चौक.
- अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
- रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.
पर्यायी मार्ग :
- रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटी चौकच्या पाठीमागील रोडने वाहतूक चालू राहील.
- मिलकॉर्नर कडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीज जवळून उजवीकडे नागेश्वरवाडी डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगर मार्गे तसेच अंजली टॉकीज पासून डावीकडे खडकेश्वर म.न.पा. मार्गे जातील.
- क्रांतीचौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील.
नविन छत्रपती संभाजीनगर सिडको हडको, गजानन महाराज मंदीर विसर्जन मिरवणुक
(खालील दर्शविलेल्या मार्गाने वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहील)
- चिश्तीया चौक - अविष्कार चौक- बजरंग चौकते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन समोर- एन-7 बस स्टॉप- पार्श्वनाथ चौक- एन 9 , एम- 2, एन- 11 - जिजाऊ चौक - टी. व्ही. सेंटर चौक ते एन-12 स्वर्ग हॉटेल जवळील विहीर पर्यत. तसेच जिजाऊ चौक ते शरद टी.
- चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.
- एन-1 चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिस्तीया चौक ते व्दारकादास साडी सेंटर
- आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँक.
- सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन मंदीर, पटीयाला बँक ते गजानन मंदीर.
पर्यायी मार्ग:
- जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश कॉलनी मार्गे टी. व्ही. सेंटरकडे जाणारी वाहतूक हडको कॉर्नर मार्गे जातील व येतील.
- पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदीर चौककडे येणारी वाहने, हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉल मार्गे जातील व येतील.
- जवाहरनगर पो.स्टे. ते गजानन महाराज मंदीरकडे येणारी वाहने, माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल पाठीमागील रोडने त्रिमुर्ती चौकाकडे जातील व येतील.
- त्रिमुर्ती चौक ते गजानन महाराज मंदीरकडे येणारी वाहने, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे पाठीमागील रोड, माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पो.स्टे. मार्गे जातील व येतील.
- सेव्हन हील उड्डाणपूल कडून गजानन महाराज मंदीरकडे येणारी वाहने जालना रोडने आकाशवाणी मार्गे जातील.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
