एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : एकीकडे खैरेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, दुसरीकडे महायुतीचा उमेदवारचं ठरेना; संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं!

Lok Sabha : संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं असून, महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात येत आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, अजूनही महायुतीमधील काही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. ज्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) देखील समावेश आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुसरीकडे महायुतीत संभाजीनगरची जागा नेमकी कोणत्या पक्षाकडे याचाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं असून, महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. 

महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात आज शहरातील समर्थनगर भागातील सावरकर चौकात खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत आहे. यावेळी संजय राऊत उपस्थित राहणार आहे. सोबतच शरद पवार गटासह काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते देखील उपस्थित राहणार आहे. 

महायुतीचा उमेदवार कोण? 

महायुतीमध्ये संभाजीनगरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेसह भाजपकडून देखील या जागेवर दावा केला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेदेखील या जागेसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजूनही संभाजीनगरचा तिढा कायम आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. 

भागवत कराडांचे जोरदार प्रयत्न....

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड देखील इच्छुक आहेत. यासाठी मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडून तयारी सुरु आहे. मंत्री असतांना त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यातच मागील काही दिवसांत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली असून, त्यामुळेच भाजपकडून संभाजीनगरच्या जागेवर दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेत दोन गट झाल्याने सेनेची ताकद देखील कमी झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे भागवत कराड यांच्या उमेदवारीबाबत महायुती काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. 

माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील मैदानात...

मागील लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत ठरलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यंदाही लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे खैरेंचा पराभव झाल्याचं बोलले जाते, त्यामुळे जाधव चर्चेत आले होते. अशात आता पुन्हा जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभाजीनगरमधील लढत रंगतदार होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shiv Sena Meeting : छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण?, शिंदेसेनेची महत्वाची बैठक; 'या' नेत्यांची उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Embed widget