एक्स्प्लोर

Gold Mine : चंद्रपुरात जिल्ह्यातील ब्राह्मणी परिसरात सोन्याचे साठे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; भूगर्भ सर्वेक्षण विभागाचा दुजोरा

Gold Mine : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे सापडल्याचा सुतोवाच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

Gold Mine : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे सापडल्याचा सुतोवाच नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभाग म्हणजेच जीएसआयने ही त्यास दुजोरा दिला असून त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्राह्मणी परिसरात सोन्याचे साठे असल्याचं सांगितलं आहे. त्या शिवाय भंडारा जिल्ह्यातील खैरी इटवाही, भीमसेन किल्ला परिसरात तसेच गरारा-मडकी परिसरात ही जमिनीच्या आत सोन्याचे साठे असण्याची शक्यता जीएसआयच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील काळ्या माती खाली दगडामध्ये सोन्यासह इतर मौल्यवान धातू लपल्याचे समोर आले आहे.

भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने अनेक वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील खैरी इटवाही व भीमसेन किल्ला परिसरात ही सर्वेक्षण केले होते. तेव्हा भूगर्भात त्या ठिकाणी अनेक महत्वाचे धातू असल्याचे समोर आले होते. त्यामध्ये सोनं, तांबा आणि टंगस्टन असल्याचा अहवाल भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने राज्य सरकारला दिला आहे. त्याशिवाय भंडारा जिल्ह्यातील गरारा - मडकी परिसरातही भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. त्या ठिकाणी सोनं आणि टंगस्टन असल्याचे समोर आले होते. त्या संदर्भातला अहवाल ही सप्टेंबर 2015 मध्येच राज्य सरकारला देण्यात आला आहे.

नुकतच भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्राह्मणी परिसरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार ब्राह्मणी परिसरात जमिनीमध्ये सोने आणि बेसमेटल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्राह्मणी परिसरातील सोने असलेले भाग 5.9 वर्ग किमी परिसरात विस्तारलेले आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील परसोडी, कीटाळी आणि मरूपार परिसरात भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने अनेक वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. मात्र तिथे जमिनीखाली सोन्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे.

आता प्रश्न असा आहे की जमिनीचे आत असलेले सोन्याचे साठे पुरेशा प्रमाणात आहेत की नाही. कारण त्यावरच तिथे व्यवसायिक स्वरूपात उत्खनन शक्य आहे की, नाही हे स्पष्ट होणार आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी भूगर्भात कोणकोणते धातू आहेत, याचा अभ्यास करून संबंधित ठिकाणी सोन्याचे साठे असल्याचे अहवाल सरकारला दिले आहे. आता संबंधित ब्लॉकचा लिलाव कधी आणि कोणाला करायचा हे सरकारच्या हातातला विषय आहे. एकदा संबंधित ब्लॉक कुठल्याही खाजगी कंपनीला बहाल करण्यात आल्यानंतर या तिन्ही परिसरात सोन्याचे प्रत्यक्ष उत्खनन शक्य होणार असल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget