एक्स्प्लोर

चंदा कोचर यांच्या बडतर्फीला दिलेली परवानगी कायदेशीरच, आरबीआयची हायकोर्टात माहिती

बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या बडतर्फी प्रकरणी रिझर्व बँकेनं मुंबई उच्च न्यायालयात आपली भुमिका स्पष्ट केली. त्यानुसार आयसीआयसीआय बँक व्यवस्थापनाकडून फेब्रुवारीमध्ये आलेला प्रस्ताव आणि कागदपत्रांनुसार मार्चमध्ये रिझर्व्ह बँकेने या कारवाईला समंती दिली होती. तसेच ही समंती ऑक्‍टोबर 2018 पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात आली आहे, असं स्पष्ट करत या निर्णयामध्ये कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग झालेला नाही, असा दावाही आरबीआयच्यावतीनं करण्यात आला आहे.
30 जानेवारी 2019 मध्ये बँकेनं त्यांच्याविरोधात केलेल्या बडतर्फीच्या कारवाईला कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला बडतर्फ करताना आरबीआयची पूर्वपरवानगी आवश्यक असते, त्यामुळे याप्रकरणी आता कोचर यांनी आरबीआयलाही प्रतिवादी केलंय. आयसीआयसीआय बँकेनं मात्र बडतर्फीची ही कारवाई कायदेशीररीत्या योग्यच असल्याचा पुन्हा एकदा पुनरूच्चार केला. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं तूर्तास ही सुनावणी 13 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.
 
काय आहे प्रकरण :
आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने जानेवारी 2019 मध्ये कोचर यांना पदावरुन हटविणयाचा निर्णय जाहीर केला होता. तसेच त्यांचे एप्रिल 2009 ते मार्च 2018 या कालावधीत मिळालेला ७.४ कोटींचा बोनस परत करण्याचे आदेश देत त्यांचे अन्य आर्थिक भत्तेही रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी आता बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जर साल 2018 मध्ये आपण लवकर निवृत्ती घेत असल्याचं बँकेला कळवलं होतं आणि बँकेनं हा निर्णय स्वीकारलाही होता. तर मग अचानक ही बडतर्फीची कारवाई का? असा सवालही त्यांनी या याचिकेतून उपस्थित केला आहे.  बँकेने केलेली ही हकालपट्टी बेकायदेशीर आणि नियमांनुसार नाही असा दावा कोचर यांनी या याचिकेमध्ये केला आहे.
साल 2009 ते 2011 दरम्यान बँकेनं व्हिडीओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचं कर्ज दिलं आहे. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. सीबीआयबरोबरच सक्तवसुली संचालनालयही याप्रकरणी तपास करीत आहे. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
Embed widget