एक्स्प्लोर

कोल्हापुरातील महामुनी अॅग्रोच्या नारळ शिडीला केंद्राकडून पेटंट मंजूर

महामुनींनी तयार केलेल्या नारळ शिडीला पॅडल सिस्टिम्स, रबरी हॅण्डल ग्रीप, वायररोप आणि सेफ्टी बेल्टची सोय

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील प्रयोगशील उद्योजक सुनिल महामुनी यांनी विकसित केलेल्या नारळ काढणी शिडीस केंद्र शासनाचे पेटंट मंजूर झाले आहे. ही शिडी नारळ तसेच सुपारीच्या बागेमध्ये वापरली जाते. महामुनी गेली 15 वर्षे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी विकसित केलेली नारळ काढणीची शिडी आज शेकडो शेतकरी, शेतमजूर वापरतात. या शिडीला सेफ्टी बेल्टची योजना केल्याने नारळाच्या झाडावर चढल्यानंतर सुरक्षितपणे नारळ काढणी, फवारणी व स्वच्छता करता येते. महामुनी यांनी अतिशय कल्पकतेने ही नारळ काढणी शिडी विकसित केली आहे. आजवर कसबी मजूर झाडावर चढून नारळ काढीत असे. मात्र, ते धोकादायक असे. यावर उपाय म्हणून महामुनी यांनी पॅडलच्या सहाय्याने झाडावर सहजपणे चढ-उतार करता येईल, अशी योजना या शिडीमध्ये केली आहे. यामध्ये पॅडल सिस्टिम्स, रबरी हॅण्डल ग्रीप, वायररोप आणि सेफ्टी बेल्टची सोय केली आहे. यामुळे आज शेतकरी, शेतमजूर, महिला आणि मुले-मुली सुद्धा सहजपणे नारळीच्या झाडावर चढतात. आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील हजारो शेतकरी ही शिडी वापरून नारळ, सुपारीची काढणी करतात. तसेच या शिडीच्या माध्यमातून पुर्णवेळ नारळ, सुपारी काढणीचे काम करणारे मजूर स्वयंरोजगारी झालेले आहेत. केरळ विद्यापीठाने केलेल्या पारंपारिक सीडीपेक्षा ही शिडी नाविण्यपूर्ण आणि सुरक्षित आहे. केंद्र शासनाच्या पेटेंट विभागाने या शिडीला पेटेंट मंजूर केले असून त्याचा मंजुरी क्रमांक 299829 असा आहे “आम्ही विकसित केलेली नारळ काढणीची शिडी ही नाविण्यपूर्ण आणि नारळ काढणीतील जोखमीचा विचार करून सुरक्षित आणि दणकट बनविलेली आहे. यामुळे वाकड्या-तिकड्या नारळाच्या झाडावर, पावसाळ्यातसुद्धा सहजपणे आणि बिनधोक चढता येते. गेली काही वर्षे आम्ही यासाठी प्रयत्नशील होतो. केंद्र शासनाच्या विविध चाचण्यातून आम्हाला आता पेटंट मिळालेले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आमच्या या उत्पादनाला आता युनिक स्वरूप आलेले आहे.”, असे महामुनी यांनी सांगितले. तसेच,  नजीकच्या काळात आम्ही गुजरात, आरिसा, केरळ, त्रिपुरा या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही शिडी उपलब्ध करणार आहोत, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget