मंत्रिपदासाठी इच्छुक नाही, पण मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागणं चांगलं नाही - शिंदे गटातील आमदार
Sanjay Gaikwad: आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही.
Sanjay Gaikwad: सहा महिन्यानंतरही राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्यानं टीका करत असतात. अता शिंदे-फडणवीस सरकारला घराचा आहोर मिळाला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर रोखठोक भाष्य केलेय. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत , अनेक लोक मंत्रीपदासाठी आस लावून बसलेले आहेत. आम्ही फडणवीस व शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा.
हो बच्चू कडू यांचं बरोबर आहे , अनेक जण मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत , मंत्रिपदाचा विस्तार झाल्यास राज्यातील कामे जलद गतीने होतील लवकर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्ही आग्रह करू, असे गायकवाड म्हणाले. संजय राऊत यांच स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही , हे दोन वर्षे काय 2024 नंतर 2029 पर्यंत आम्हीच सरकार मध्ये राहू आणि त्यानंतर ही आम्हीच राहू , एकनाथ शिंदे सुद्धा असतील, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केलाय.
संजय राऊत यांनी देशभरात फिरून पाहावं की भाजपा हा एक मोठा समुद्र आहे आणि भाजपा शिवसेना अशी युती आहे , संजय राऊत यांनी तर शिवसेना डबक्यापेक्षा बेकार केलीये , भाजपा आणि आम्ही महासमुद्र आहोत हे सगळ्या देशाला माहीत आहे, असं प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊतांना दिलेय. .
शिंदे गटाचा डीएनए चेक करायला पाहिजे , संजय राऊतांच्या मागणीवर गायकवाड म्हणाले की, 'खरंय... आमचा डीएनए चेक केला तर नक्कीच बाळासाहेबांचे विचारच त्यातून बाहेर पडतील. मात्र यांचा डीएनए चेक केला तर काय बाहेर पडेल..? हे कोणत्या विचारांनी तिकडे गेले..? जे परिवर्तन व्हायचं होत तर सहा महिन्यापूर्वीच झाल आहे , आता खरं परिवर्तन त्यांचं होणं बाकी आहे की त्यांच्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार जाणे आणि परिवर्तन होणे गरजेचे आहे.'
खरं तर बाळासाहेबांनी लावलेला शिवसेना नावाचा महावृक्ष यांनी भाजपाशी युती तोडून उन्मडून पाडला, आता उरले सुरले लोक ही शिवसेनेतून जात आहेत. या सरकारने सत्तेत आल्यापासून अनेक जलद निर्णय घेतल्याने संजय राऊत यांचा जळफळाट होत आहे, त्यामुळे असे आरोप करत आहेत, असे संजय गायकवाड म्हणाले.