मोठी दुर्घटना : भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी; चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना
Buldhana Bus Accident : खाजगी बसच्या भीषण अपघातात 18 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील किंनगाव राजा गावाजवळ ही घटना घडली आहे.
बुलढाणा : खाजगी बसचा भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. या भीषण बस अपघातात 18 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे चिंतामणी ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील किंनगाव राजा गावाजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसचा वेग जास्त असल्याने अपघातानंतर बस 100 फूट घासत रस्तावर पुढे सरकली. अपघातानंतर बसच्या दरवाजा बंद झाला होता, इमर्जन्सी डोअर नसल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.
खाजगी बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी
नागपूरकडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवासी बस उलटल्याने झालेल्या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जखमीमध्ये यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील राहिवासीयांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-नागपूर मार्गावर सावखेड फाटा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा या परिसरात शुक्रवारी, 7 जून रोजी ही दुर्घटना घडली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं समोर आलं आहे.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना
पुणे ते मानोरा, वाशीमकडे जाणाऱ्या एआर 26 ए 9741 क्रमांकाच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातातील जखमींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- योगेश गणेश शेंदुरकर, वय 25 वर्ष, रा. कोठारी, तालुका मंगरूळपीर, जिल्हा वाशिम
- दिनेश मधुकर राठोड, वय 24 वर्ष, रा. पिंपळखुटा तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ
- संदीप बाबू सिंग राठोड, वय 31 वर्षे, रा. पिंपळगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ
- प्रीतम संतोष पडघान, 24 वर्ष, राहणार आडोळी, तालुका-जिल्हा- वाशिम
- अंकुश प्रल्हाद पोहाणे, राहणार कवठळ, तालुका मंगरूळपीर ,जिल्हा वाशिम
- सुनील मोहन पवार, राहणार वार्डा खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम
- वैष्णवी पुरुषोत्तम अंभोरे, 19 वर्ष, राहणार सावरखेड तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला
- उज्वल पुरुषोत्तम अंभोरे, 16 वर्ष, राहणार सावरखेड, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला
- सौरव विजय पोले, वय 21 वर्ष, राहणार शिवनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ
- सुरेश मानसिंग जाधव, 47 वर्ष, राहणार भोईनी, तालुका मानोरा जिल्हा वाशिम
- स्वराज राम राठोड, वय 3 वर्ष, राहणार सावरगाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम
- सदाशिव विष्णू निकष, वय 34 वर्ष राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
- प्रतीक्षा सदाशिव निकष, 28 वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
- सरस्वती गजानन गायकवाड, वय 37 वर्ष, राहणार वाशिम
- मिना भारत कांबळे, वय 50 वर्ष, राहणार वाशिम
- अविनाश भिमराव मोरे, राहणार शहापूर तालुका जिल्हा वाशिम
- दिपाली अविनाश मोरे, वय 26 वर्ष, राहणार शहापूर, तालुका जिल्हा वाशिम.