Medha Kulkarni: गरबा ऐन रंगात आला असताना खासदार मेधा कुलकर्णींची मैदानात एन्ट्री; पुण्यातील कार्यक्रमच बंद पाडला, म्हणाल्या, हा धिंगाणा...
Medha Kulkarni on Garba Events: भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या गरब्याच्या कार्यक्रमाच्या मुद्यावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Medha Kulkarni Pune : राज्यासह देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच सर्वत्र मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या गरब्याच्या (Garba Events) कार्यक्रमांची रेलचेल असून तरुणाई मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होत आहे. मात्र असे असताना पोलिसांकडून घालून दिलेल्ल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune Garba Events) घडल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या याच मुद्यांवरून चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. पुण्यातील एक कार्यक्रम रंगात आला असतानाच मेधा कुलकर्णी यांनी थेट धाड टाकत हा गरबा बंद पाडलाय.
गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर आजवर कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपण कार्यक्रमात येत हा गरबा बंद पाडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी? (Medha Kulkarni on Garba Events)
'दरवर्षी या ठिकाणी धिंगाणा होत असल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होतो. आताही मला अनेकांचे फोन आले, मी इतर ठिकाणी आरती करायला गेले होते, तेव्हाही मला काही व्हिडीओ लोकांनी पाठवले. परिसरात लिव्हर, कॅन्सर झालेले पेशन्ट आहे. एक अतिशय 90 वर्षांची महिला आहे. हे कसं सगळ्यांनी सहन करायचं? दरवर्षी इथं दहीहंडी होते. तरी सुद्धा घरातील आजी असेल, आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. आवाजाची मर्यादा न पाळल्याने हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही' आवाजाची आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही', असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय.
या संदर्भात या पूर्वी देखील आम्ही पोलिसांना फोन करतोय, डीसीपी कदम यांना फोने केला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देखील फोन केलाय. तरी आवाज पाळण्यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हला सनदशीर मार्गाने हे करावं वाटलं. त्यामुळे इथून पुढे हा कार्यक्रम इथे होणार नाही. असेही खासदार मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या
संबंधित बातमी:
























