एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली उद्या मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार

एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळं आता खडसेंचा वेगळा निर्णय 6 जनपथवरुन होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवी दिल्ली : भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असं सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज दिल्ली दरबारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.  एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. मात्र, अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळं आता खडसेंचा वेगळा निर्णय 6 जनपथवरुन होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, उद्या खडसे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्वाची बाब म्हणजे खडसे भाजपच्या नेत्यांची भेट न घेताच मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यामुळे आता खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश असेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांशी भेटीमध्ये मतदारसंघातील सिंचन योजनांवर चर्चा केली. या योजनांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी पवारांची भेट घेतली असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी पवारांनी मतदारसंघातील पराभवाबाबत विचारले असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले. शरद पवारांना भेटायला जाण्याआधी खडसे म्हणाले की, आजवर राजकीय करिअरमध्ये अनेक पक्षांनी मला अनेक वेळा त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. मला वेगवेगळी पदं देण्याच्या ऑफर देखील दिल्या गेल्या. मात्र मी पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. पक्ष वाढवला आणि विस्तार केला. मात्र आता पक्षातून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कारण नसताना आरोप केला जात असेल, हेतुपुरस्पर मला टाळलं जात आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तरीही मला क्लीन चिट दिली गेली नाही, असे खडसे यांनी पवार यांना भेटायला जाण्याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर
मागच्याच आठवड्यात खडसे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले. बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय असे म्हटले होते. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे देखील खडसे यांनी सांगितलं होतं.  मला जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसे यांनी दिला होता. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करुन कुणी दोषी आढळले तर कारवाई करण्याचे आश्वासन खडसेंना दिले होते. Eknath Khadse | मी काय गुन्हा केला? ते अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे     हे ही वाचा -   भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या? 
विनोद तावडे एकनाथ खडसेंच्या भेटीला, भाजपमधील नाराजी नाट्यावर खडसेंची प्रतिक्रिया 
बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे 
सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget