एक्स्प्लोर

परप्रांतियांच्या विरोधातली भूमिका सोडली तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार : चंद्रकांत पाटील

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र ही भूमिका स्पष्ट करण्याआधीच भाजपकडून मनसेला सोबत घेण्यासंबंधीचे संकेत दिले जाऊ लागले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

मुंबई : मनसे अधिवेशनात राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र त्यापूर्वी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी परप्रांतियांच्या विरोधातली भूमिका सोडली तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार केला जाईल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. मनसेनं आज अनेक ठराव मांडले. मात्र परप्रांतियांसंदर्भातल्या भूमिकेवर मनसेनं भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सत्तेच्या खुर्चीसाठी ते एकत्र येऊ शकतात तर सत्यासाठी आम्ही का एकत्र येऊ शकत नाही? असं म्हणत मनसेसोबत युतीचे संकेत दिले होते. याविषयी एबीपी माझाशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले होते की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. आम्ही सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही. मनसेच्या भूमिकेचं स्वागत करताना शिवसेनेवर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली होती. मुनगुंटीवार म्हणाले की, विचारामध्ये जेव्हा समानता असते तेव्हा युती होते. शिवसेनेबरोबर आमची युती होती तेव्हा आमच्या विचारामध्ये युती होती मात्र शिवसेनेला सत्तेसाठी काँग्रेसची विचारधारा जवळची वाटायला लागली त्यामुळे ते आमच्यापासून दूर झाले. आता मनसेने देशहित, राष्ट्रहिताचा निर्णय केला आहे. त्यामुळे जे जे समविचारी पक्ष आहेत त्यांना एकत्र येण्यासाठी कुठेही अडचण नसते. मनसेने आज जो भगवा रंग स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच नुकसान होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले होते. ते म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रभक्तीची जी जिद्द होती. ती आज बदलून राष्ट्रहितापेक्षा स्वहित, देशहितापेक्षा खुर्ची हित असे दृश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे निश्चित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रध्दा ठेवणाऱ्यांच्या मनात द्वंद सुरु असेल. त्यामुळे अशांसाठी मनसे एक व्यासपीठ म्हणून पुढे आलेली आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर जोरदार टीका केली. परंतु त्याआधी त्यांनी कौतुकही केलं होतं ते कसं विसरता येईल. मात्र शिवसेनेने जेवढी टीका सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यावर केली तेवढी टीका तर जगात कोणी केली नसेल. शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी जर सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊ शकतात तर आम्ही भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणत सत्तेपेक्षा सत्यासाठी का एकत्र येऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi News : टी-20चा स्टार वैभव सूर्यवंशी कसोटीत फेल ठरणार? इंग्लंडच्या दिग्गजाचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? सगळेच हैराण
टी-20चा स्टार वैभव सूर्यवंशी कसोटीत फेल ठरणार? इंग्लंडच्या दिग्गजाचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? सगळेच हैराण
दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी
दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी
Ukraine Drone Attack: यूक्रेनचा हजारो ड्रोनद्वारे रशियावर सर्वात मोठा हल्ला, 1900 ड्रोन रोखल्याचा रशियाचा दावा, 2 जणांचा मृत्यू
यूक्रेनचा हजारो ड्रोनद्वारे रशियावर सर्वात मोठा हल्ला, रशियानं 1900 ड्रोन रोखले, दोघांचा मृत्यू 
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Embed widget