एक्स्प्लोर

Bhandara News : शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र, एकनिष्ठ असल्याची दिली हमी 

एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी पत्र लिहिले  आहे.

Bhandara News : एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी पत्र लिहिले  आहे. हे पत्र लिहून त्यानं आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची हमी दिली आहे. सध्या हे पत्र भंडारा (Bhandara ) जिल्ह्यात चांगलचं व्हायरल होत आहे. पवन खवास (Pavan Khavas) असे या शिवसैनिकाचे नाव आहे. या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षासोबत आपण आजही निष्ठेने सोबत राहू अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी लिहिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्यानं नवनवीन घडामोडी सुरु आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे.  शिवसेनेला आता खरी शिवसेना हीच आहे, हे सिध्द करण्याचं आव्हान आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत प्रत्येक तालुक्यातून शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचं आवाहन केलं होतं. याच आवाहनाला साथ देत तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील युवा शिवसैनिक पवन खवास तरुणानं स्वतःच्या रक्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षनिष्ठेनं प्रेमपूर्वक निष्ठेनं पत्र लिहलं आहे.

पवन खवास या तरुणान रक्तानं लिहलेलं हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्या पत्राची शिवसैनिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. सदर पत्राची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुध्दा घेतली आहे. पवन खवास या शिवसैनिकावर पक्ष निष्ठेचे कौतुकाची थाप दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं शिवसेनेत फुट पडली आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 40 आमदारांनी त्यांच्याविरोधात बंड केले आहे. एवढेच नाहीतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळं शिवसेनेकडून आता सावध पवित्रा घेतला जात आहे. आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते पण यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचे ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असे बदल पक्षामध्ये केले जात आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. असा मजकूर या पत्रावर असणार आहे. त्यामुळे कोणी पक्ष सोडला तरी त्यापेक्षा वेगळा काही रोल घेऊ नये म्हणून ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुखांना अशाप्रकारचे पत्र द्यावे लागणार आहे. भविष्यात कोणी पक्षाबाबत वेगळा असा दावा करु नये शिवाय शिवसैनिकांची वज्रमूठ कायम आहे हे दाखवून देण्यासाठी हा फंडा राबवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांनां लगावला टोला
Vidarbha Rain Deficit : मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
Heavy Rain Maharashtra: मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा
Vidarbha Rain : विदर्भात कुठे पावसाचा कहर, तर कुठे दमदार पावसाची प्रतीक्षाच! बुलढाण्यात बानगंगा नदीला मोठा पूर, तर भंडाऱ्यात पावसाअभावी भात शेती धोक्यात
विदर्भात कुठे पावसाचा कहर, तर कुठे दमदार पावसाची प्रतीक्षाच! बुलढाण्यात बानगंगा नदीला मोठा पूर, तर भंडाऱ्यात पावसाअभावी भात शेती धोक्यात, वाचा कुठे काय परिस्थिती

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget