संजय राऊत महामूर्ख, गाढवावर बसवून फिरवायला पाहिजे; शिंदे गटाच्या आमदाराचा राऊतांवर थेट निशाणा
Maharashtra Politics: संजय राऊत शक्ती कपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायची असली तर द्यायला पाहिजे, इतके मोठे महामूर्ख संजय राऊत आहेत. यांना शोभत नाहीत, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
Narendra Bhondekar on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) महामूर्ख माणूस असून त्यांनी मूर्खाचाही कळस गाठला आहे. त्यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे, अशी थेट टीका भंडाऱ्याचे (Bhandara News) आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी केली आहे. महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना शक्ती कपूर म्हणून संबोधलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देतना नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.
भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर बोलताना म्हणाले की, "शक्ती कपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायची असली तर द्यायला पाहिजे, इतके मोठे महामूर्ख संजय राऊत आहेत. यांना शोभत नाहीत, महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे महिलांचा अपमान आहे. ज्यापद्धतीनं संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे, त्यानं समाजातील महिलांचा अपमान झाला आहे. एकीकडे 454 मतांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांनी मतदान केलं. म्हणजे, त्यामध्ये शिवसेनेचेही खासदार आहेत, ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं. त्यामध्ये संजय राऊत एकटेच विरोध करतात, म्हणजे यानं मुर्खाचाही कळस गाठला आहे. त्यामुळे यांना गाठवावर बसून फिरवायला पाहिजे, असं माझं मत आहे."
संजय राऊत हा महामूर्ख असून त्यांनं मूर्खाचा पण कळस गाठला आहे. याला गाढवावर बसवून फिरवायला पाहिजे, अशी टीका भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. महिला विधेयकावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिप्पणीवर आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना शक्ती कपूर म्हणून संबोधलं होतं. त्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. खरंतर शक्ती कपूर पेक्षाही मोठी उपाधी द्यायची असेल तर द्यायला पाहिजे, इतके महामूर्ख संजय राऊत आहेत. महिलांच्या प्रति ते बोलतात, हा महिलांचा अपमान असून ते राऊत यांना शोभत नाही. एकीकडे 454 सर्वपक्षीय ज्यात शिवसेनेचे सुद्धा खासदार आहेत, ज्यांनी महिला विधेयकाला समर्थन केलं. एकटा बावाजी विरोध करतो म्हणजे, किती महामूर्ख आहे. याला गाढवावर बसवून फिरवायला पाहिजे अशी टीका आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
काय म्हणालेले नितेश राणे?
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "महिला आरक्षण विधेयकावर बोलताना संजय राऊत यांनी त्यात नवीन काय? असं वक्तल्य केलं होतं. जे संजय राऊत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूरसारखा वागतो. जी व्यक्ती महिलेला धमकी देते, तिला महिला आरक्षण विधेयक कसं कळणार? जे संजय राऊत एका डॉक्टर महिलेला धमकी देतात, त्यांना महिला विधेयक कधीच मोठं वाटणार नाही. जेव्हा हे विधेयक संसदेत येईल, तेव्हा या संजय राऊत आणि त्याच्या मालकाच्या मुलासारखे शक्ती कपूर यांना जेलमध्ये जावं लागेल. संजय राऊत यांना संसद भवन बँकव्हेट हॉलसारख वाटतो. सर्व खासदारांना म्हणतो जुन्या संसद भवनमध्ये जावस वाटतंय. संजय राऊतची हीच भावना होती की, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री 1 मध्ये आयुष्य काढलं, ती मातोश्री सोडून मातोश्री 2 बांधण्याची काय गरज होती? तुम्ही आणि तुमच्यासारख्या शिवसैनिकांना मातोश्री 2 मध्ये यायची परवानगी तरी आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत."
पाहा व्हिडीओ : Narendra Bhondkar : संजय राऊत महामूर्ख,गाढवावर बसून फिरवायला पाहिजे ABP Majha