(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गौतमीच्या 'पाटलांचा बैलगाडा' गाण्यवर थिरकले NCP चे सभापती रितेश वासनिक, पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
लाखात एक नंबरचा आपल्या गावचा हाय बैलजोडा ठुमके लावण्यास भाग पाडलं. गाण्यावर सभापतींनी ठेका धरत पैसे उधळले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारानंतर सभापतींपचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
भंडारा : ऑटो चालक ते थेट सभापती जीवन प्रवास खडतर प्रवास आणि अन्यायाची चीड असल्याने ते प्रस्थापितांच्या विरोधात पटकन उभे राहणारे रितेश वासनिक (Ritesh Wasnik Dance Video Viral) चर्चेत आले आहेत. वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP Ajit Pawar) सभापती रितेश वासनिक चर्चेचा विषय ठरले ते एका व्हायरल व्हिडिओमुळे.
सध्या भंडारा जिल्ह्यात मंडईची धूम सुरू आहे. अशाच एका मोहाडी तालुक्यातील बीड गावात सुरू असलेल्या मंडईच्या कार्यक्रमासाठी वासनिक यांनी हजेरी लावली होती. या वेळी लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रितेश वासनिक यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरला. लाखात एक नंबरचा आपल्या गावचा हाय बैलजोडा ठुमके लावण्यास भाग पाडलं. गाण्यावर सभापतींनी ठेका धरत पैसे उधळले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारानंतर सभापतींपचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
आपल्या लाडक्या आमदारांना डिजेच्या गाण्यावर नाचताना पाहून कार्यकर्त्यांनीही देहभान हरपून नाचायला सुरुवात केली. हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा लावणी नृत्यांगणेसोबत डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभापतींचा हा व्हिडीओ समोर आला आहे.
आमदार राजू कोरेमोरेंचा डान्स व्हिडीओ व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कोरेमोरे सागर गभणे या कार्यकर्त्याचं नाव असून त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमदार साहेबांनी धम्माल उडवली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी कार्यकर्त्याने डीजे लावाला होता, या डिजेवर वाजणाऱ्या बत्ती गुल पावरफूल या गाण्याने आमदार कोरेमोरे यांना ठुमके लावले.
गौतमीच्या गाण्यांची क्रेझ
‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते. गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमीची गाणी प्रसिद्ध असून गौतमीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चक्क सभापतींना देखील तीच्या गाण्यांवर डान्स करण्याचा मोह आवारला नाही.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram