एक्स्प्लोर

Bhandara News : विस्ताराआधीच BRS ला धक्का; विदर्भातील नेत्याचा भाजपात प्रवेश, जिल्हा परिषदेतील समीकरणे बिघडली

BJP Bhandara : विदर्भात भारत राष्ट्र समितीला धक्का बसला आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप ताले यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Bhandara News :  तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे त्यांना पक्ष विस्तार आणि बळकटी आधीच धक्का बसला आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले भंडारा जिल्हा परिषदचे (Bhandara ZP) उपाध्यक्ष आणि बीआरएस पक्षाचे संदीप ताले यांनी अन्य दोन जिल्हा परिषद सदस्यांसह आज नाट्यमयरीत्या भाजपात (BJP) प्रवेश केला. यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ताले हे बीआरएस पक्षाचे विदर्भाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. 

संदीप ताले यांच्यासह उमेश पाटील आणि धृपदा मेहर या अन्य दोन अशा तिघांनी भाजपात प्रवेश केला. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. 52 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21 सदस्य असून एक अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नेते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाच्या पाच सदस्यांना घेवून काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, भाजपनं चरण वाघमारे गटाच्या पाच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्या कारवाईची टांगती तलवार असल्याने यापूर्वी दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, आज तिघांनी प्रवेश केला. या प्रवेशानं बीआरएस पक्षाचे नेते चरण वाघमारे यांना जबर धक्का बसला आहे. 
भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत या तिघांनी आज नागपूर इथं भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, काँग्रेस मध्ये सत्तेत सहभागी असताना काँग्रेसला सोडून पाच जणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, भाजपाकडे विश्वासदर्शक ठरावाच्या आवश्यक असलेला 35 हा आकडा जुळत नसल्यानं जिल्हा परिषद मधील काँग्रेसच्या सत्तेला सध्यातरी धोका नाही. 

भंडारा जिल्हा परिषदेचे संख्याबळ

एकूण सदस्य संख्या - 52
बहुमताचा आकडा   - 27
------------------------------------
सत्ताधारी पक्ष संख्या - 27
----------------------------------
काँग्रेस सदस्य संख्या - 21
चरण वाघमारे गट     - 05
अपक्ष                      - 01
------------------------------------
विरोधी पक्षाचा आकडा - 25
--------------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेस संख्या - 13
भाजप संख्या              - 07
अपक्ष                         - 03
बसपा                         - 01
शिवसेना                     - 01
----------------------------------------
विरोधी पक्षात अगोदरचे 25 आणि आता चरण वाघमारे गटाचे सहभागी झालेले 05 सदस्य. असे एकूण 30 संख्या होत आहे. त्यामुळे अविश्वासदर्शक ठरावासाठी 35 सदस्यांची गरज असल्यानं आणखी 05 सदस्य कमी पडत असल्यामनं काँग्रेसच्या सत्तेला धोका नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget