एक्स्प्लोर

Bhandara Leopard Attack : जखमी बिबट्यावर उपचारासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर त्याच बिबट्याकडून हल्ला

Bhandara Leopard Attack : अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्यावर उपचार करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर त्याच बिबट्याने हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे.

Bhandara Leopard Attack : अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादी बिबट्यावर (Leopard) उपचार करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर (Forest Employee) त्याच बिबट्याने हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात घडली आहे. कृष्णा सानप (वय 34 वर्षे) असे जखमी वनरक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय इथे उपचार सुरु आहेत. भंडारा जिल्ह्याच्या मोहघाटा जंगल शिवारातील महाराष्ट्र वन विकास महामंडळ रोपवाटिकाजवळ ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन कर्मचारीही धास्तावले आहेत.

नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर लाखनीकडून साकोलीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकच्या धडकेत मादी बिबट जखमी झाली होती. दरम्यान याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर पडलेल्या जखमी मादी बिबट्यावर उपचार करत असताना याच बिबट्याने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर बिबट्या जंगल शिवारात पळून गेला. या हल्ल्यात कृष्णा सानप जखमी झाले.

वन रक्षकावर उपचारांसाठी भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात हलवलं
जखमी वन रक्षक कृष्णा सानप यांना प्राथमिक उपचाराकरता लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जखमी मादी बिबट्या जंगल शिवारात पळून गेला असल्याने वन कर्मचारी तिचा शोध घेत आहे. मात्र संततधार पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे.

नाशिकमध्ये बिबट्याने श्वानाला फस्त केलं
दुसरीकडे नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं. खरंतर नाशिक शहर आणि बिबट्या हे जणू समीकरण झालं आहे. नाशिकमधील गिरणारे गावात घराबाहेर असलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला. गिरणारे गावातील शेतकरी पोपट थेटे यांच्या घराबाहेर श्वान होता. बिबट्याने या श्वानावर हल्ला करत त्याला फस्त केलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नाशिकमधील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget