एक्स्प्लोर

लावणी नृत्यांगणावर पैसे उधळणे सभापतींना भोवलं ;अश्लील व्हायरल व्हिडीओनंतर वरठी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhandara Dance Viral Video: जिल्ह्यातील तुमसर या तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे घडलेल्या विवस्त्र डान्स प्रकरणात लावणी नृत्यांगणावर पैसे उधळणे हे एका सभापतींना चांगलेच भोवलं आहे. 

Bhandara Dance Viral Video : भंडारा : जिल्ह्यातील तुमसर या तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे घडलेल्या विवस्त्र डान्स प्रकरणात (Bhandara Dance Viral Video) लावणी नृत्यांगणावर पैसे उधळणे हे एका सभापतींना चांगलेच भोवलं आहे. या प्रकरणाची वक्तव्य परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  (Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे पुढे गेल्यावर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती असलेल्या रितेश वासनिक यांनी नृत्यांगनावर पैसे उधळले होते. त्यानंतर त्यांनी असे करत असतानाचा व्हिडीओ तयार करून समाज माध्यमावर पोस्ट केला होता. अल्पावधीतंच हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. ही बातमी ABP माझा ने दाखविल्यानंतर पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणी वरठी पोलिसांनी सभापती वासनिक यांच्यासह लावणी आयोजक अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामात झालेल्या गोंधळानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोबरवाही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण नितीन मदनकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच, या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. या खळबळजनक प्रकरणाची दखल विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांना सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय होतं प्रकरण?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथं मंडई निमित्त आयोजित कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला होता. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला असून त्यात अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल (Bhandara Dance Viral Video)  करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या (Nagpur RK Hungama Group) तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल करीत होते. आता या प्रकरणाच्या तपास पुढे जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे. 

2 वर्षापूर्वी घडलेल्या प्रकरणाची आठवण   

दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात अशाच पद्धतीने अश्लील डान्सचे प्रकार घडले होते. तेव्हा पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र दोषींवर ठोस कारवाई न झाल्यामुळे आता तसेच प्रकार भंडारा जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागतABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget