Bhandara Crime : लग्नाच्या जेवणात बीफची मेजवाणी देणं भंडाऱ्यातील एका नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे घडलाय. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 


गाईंची कत्तल केल्याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक 


1) एजाज शहा (वय 21) - नवरदेव
2) शाकीर शेख (28)
3) मोशिन खान (21)
4) शरीफ शेख (30)
5) इझास निसार शहा (21) 


हे सर्व पवनी येथील रहिवाशी आहेत.


पोलिसांनी नवरदेवाला अटक केल्याने खळबळ 


अधिकची माहिती अशी की, लग्नाच्या मेजवानीसाठी तीन गाईंची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नवरदेवासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनीतून ही घटना समोर आली आहे. आज सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना गाईंच्या मासांची मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली होती. मात्र, पाहुण्यांना बीफची मेजवानी देणे नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडाऱ्याच्या पवनी इथं आज करण्यात आली. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 










इतर महत्त्वाच्या बातम्या


Plane book for Yatra Kolhapur : भादवनकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला आख्खं विमान बूक, इजार-टोप्या घालून बाया-माणसं मुंबईतून विमानाने गावात!


प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच