Plane book for Yatra, Kolhapur : मुंबई (Mumbai) राहणाऱ्या माणसांना गावाची ओढ प्रचंड असते.... सणवार किंवा यात्रा आली की हमखास मुंबईकर मुंबईकरांची पाऊलं गावाकडे वळतात... पण गावाकडे जाताना संपूर्ण विमान बुक केल्याचं तुम्ही कधी ऐकलयं का?? हो असं घडलंय...  मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी यात्रेला जाण्यासाठी चक्क विमान बुक केलं... कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भादवणच्या नागरिकांनी मुंबईतून यात्रेला गावाकडे येण्यासाठी चक्क विमान बुक केलं (Plane book for Yatra) होतं. आज ते विमानाने गावाकडे पोहोचले आहेत. 






कोल्हापूर विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष


गावच्या यात्रेला जायचं असेल तर तुम्ही काय करणार??? एक तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाल किंवा मुंबईत असाल तर ट्रॅव्हल्सने गावाकडं याल.. पण कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणच्या नागरिकांनी मुंबईतून यात्रेला गावाकडे येण्यासाठी चक्क विमान बुक केलं आणि आज कोल्हापूर विमानतळावर हे गावकरी दाखल झाले आहेत... महाराष्ट्रातील भादवण हे एकमेव गाव असेल की ज्या गावातील नागरिकांनी यात्रेला जाण्यासाठी थेट विमानाचा वापर केला.... कोल्हापूर विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष केला... पण यात्रेला विमानाने यायची संकल्पना नेमकी कशी सुचली ते देखील जाणून घेऊयात...


बी आर पाटील यांनी गावकऱ्यांच्या ग्रुपवर ही संकल्पना मांडली... त्याच्यानंतर सगळ्यांनीच याला होकार दर्शवला... नावाची नोंद सुरू झाली आणि बघता बघता संपूर्ण विमान फुल्ल झालं... अनेकांचा हा विमान प्रवास पहिलाच होता गावाकडची काही हौशी मंडळी मुंबईत गेली आणि मुंबईतून विमानाने यात्रेला आली...


गावात शाळेतल्या चिमुकल्यांनी लेझीम खेळत केलं स्वागत 


गावाकडं यात्रेला येण्याचा मान हा माहेरवाशिनीला असतो.. या विमानातून काही महिला देखील यात्रेसाठी गावाकडे आल्या... त्यामध्ये एका माहेरवाशीन देखील होती... माहेरला यायचं आणि ते देखील विमानाने त्यामुळे माहेरवाशिनीचा आनंद गगनात मावत नव्हता....मुंबईत राहणारी गावाकडची लोक थेट विमानाने आलेत म्हटल्यानंतर गावाकडे देखील जंगी स्वागत झाले....गावात शाळेतल्या चिमुकल्यांनी लेझीम खेळत स्वागत केलं...गावाकडं यात्रेला विमानाने जायची हौस फिटल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.


भादवनकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला आख्खं विमान बूक, इजार-टोप्या घालून बाया-माणसं मुंबईतून विमानाने गावात!



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Chandrashekhar Bawankule : गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण


Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?