एक्स्प्लोर

मामाच्या गावात नर्सिंग शिकणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीची गळ्याला दोरी, चिठ्ठीत लिहिलं, स्वत: जीवन संपवतेय, कुणीही जबाबदार नाही!

भंडारा जिल्ह्यातील साकोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 19 वर्षीय नर्सिंगच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातील साकोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 19 वर्षीय नर्सिंगच्या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात तिने स्पष्ट केलं आहे की, “मी स्वतः आत्महत्या करतेय, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.” ही घटना भंडाऱ्याच्या साकोली येथील पंचशील वार्डात घडली.

मामाच्या गावात नर्सिंग शिकणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीची गळ्याला दोरी

मृत नर्सिंग विद्यार्थिनीचं नाव प्रेरणा खोब्रागडे (१९) असं आहे. ती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पंचवटी गावची रहिवासी असून सध्या साकोली येथील मामाकडे राहून नर्सिंग महाविद्यालयात प्रशिक्षण घेत होती.  तिने गळफास घेऊन आयुष्य संपविल्यानं कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी असताना केलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुसाईड नोटमध्ये मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका असं नमूद करण्यात आलं असलं तरी, तिने आत्महत्येसारखी टोकाची पावलं का उचलली यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबईत पावसाचा हाहाकार, वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू

दुसरीकडे, मुंबईतील भांडूपमध्ये रस्त्यावरती खुले असलेल्या विजेच्या तारांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. मृत्यू झालेल्याचे नाव दीपक पिल्ले असून तो फक्त 17 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. त्याने कानात हेडफोन घातले होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी केलेले इशारे त्याला ऐकू आले नाहीत. रस्त्यावर महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती, आणि त्याच्याशी संपर्कात येताच विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रस्त्यातून अनेक लोक जात होते, आम्ही त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दीपककडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण कानात हेडफोन असल्यामुळे तो ऐकू शकला नाही. आम्ही मागे धावत गेले, पण तो आधीच वायरच्या संपर्कात आला होता आणि खाली पडला,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा -

Rekha Gupta News : केस धरुन ओढलं, फटाफटा तोंडावर अन् कानाखाली मारल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांसोबत नेमकं काय अन् कसं घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget