साडे तीन वर्षांत तब्बल 2000 टक्क्यांनी रिटर्न्स! 'या' मल्टिबॅगर कंपनीत पैसे गुंतवणारे ठरले लकी!
सध्या शेअर बजारात अनेक कंपन्या अशा आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. सध्या अशाच एका कंपनीची चांगलीच चर्चा होत आहे.
![साडे तीन वर्षांत तब्बल 2000 टक्क्यांनी रिटर्न्स! 'या' मल्टिबॅगर कंपनीत पैसे गुंतवणारे ठरले लकी! best stock suggestion goodluck india company become multibagger given good returns know share price of goodluck india साडे तीन वर्षांत तब्बल 2000 टक्क्यांनी रिटर्न्स! 'या' मल्टिबॅगर कंपनीत पैसे गुंतवणारे ठरले लकी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/d68233a34b4dc7ccd79ca61edbbfef571725762776943988_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मेटल सेक्टरमध्ये काम करणारी एक छोटी कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीने गेल्या काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना चांगले आणि दमदार रिटर्न्स दिले आहेत. गेल्या साडे तीन वर्षांत हा शेअर तब्बल 2000 टक्क्यांनी वाढला आहे.
एका महिन्यात 36 टक्क्यांनी तेजी
हा मल्टिबॅगर स्टॉक स्मॅल कॅप सेगमेंटमध्ये येतो. या शेअरचे नाव गुडलक इंडिया असे आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी (6 सितंबर) शेअर बाजारात पडझड झाली तेव्हादेखील हा शेअर चांगली कामगिरी करताना दिसला. शुक्रवारी गुडलक इंडिया या कंपनीचा शेअर 2.17 टक्क्यांच्या तेजीसह 1,222 रुपयांवर बंद झाला. तर गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये साधारण 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एका वर्षात बंम्पर रिटर्न्स, ठरला मल्टिबॅगर
काही काळासाठी स्थिर राहिल्यानंतर या शेअरने आता पुन्हा एकदा गती पकडली आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरने 22 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या एका वर्षाचा हिशोब केला तर गुडलक इंडिया या शेअरचे मूल्य वाढल्याचे दिसते. हा शेअर गेल्या एका वर्षांत 108 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एका वर्षाचा कालावधी लक्षात घेता हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे.
साडे तीन वर्षांत 2,102 टक्क्यांनी रिटर्न्स
दोन वर्षांपूर्वी या शेअरचे मूल्य 488 रुपये होते. म्हणजेच दोन वर्षांच्या तुलनेत आज या शेअरचे मूल्य 150 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या तीन वर्षांत हा शेअर 306 रुपयांवरून 300 टक्के वाटला आहे. साडे तीन वर्षांत या शेअरने 2000 टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स दिले आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी गुडलक इंडिया हा शेअर फक्त 55.50 रुपयांवर होता. म्हणजेच तेव्हापासून या शेअरचे मूल्य तब्बल 2,102 टक्क्यांनी वाढले आहे.
कंपनीचा शेअर नेमका का वाढला?
कंपनीच्या शेअरचे मूल्य नेमके का वाढले, हे गुडलक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम अग्रवाल यांनी सांगितले आहे. या कंपनीने आतापर्यंत आणलेले सर्व प्रोडक्ट्स हे नाविन्यपूर्ण आहेत. 2021 सालापर्यंत केलेल्या गुंतवणुकीमुळे आमच्या उद्योगात तेजी निर्माण झाली. या आर्थिक वर्षात आमचा नफा 170 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचा निव्वळ नफा 132 कोटी रुपये होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
महिला सन्मान सेव्हिंग योजना काय आहे? दोन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास मिळतो मोठा परतावा!
Gold Silver Price : सोनं चांदी महाग! दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)