Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीचं अनोखं पाऊल; बॉडी पॉझिटिव्हीटी दाखवण्यासाठी केलं खास शूट!
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती हिने सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्ससोबत एक खास शूट केलं आहे, ज्यात ती सर्व प्रकारचे शरीर हे सुंदर असून त्यात लज्जास्पद काही नाही, असा संदेश देताना दिसते.
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) तिच्या आगामी 'फटाफटी' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे आणि तिने ही व्यक्तिरेखा साकारण्यात कसलीही कसर सोडली नाही. रिताभरी चक्रवर्तीने नुकतेच सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्ससोबत एक खास शूट केले आहे. ज्यात ती सर्व प्रकारचे शरीर हे सुंदर आहेत, त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही, असा संदेश देते. हे एक बिनधास्त आणि अनफिल्टर शूट केले आहे, यातील सर्व महिलांना स्वत:वर आणि स्वत:च्या व्यक्तिमत्तावर असलेला अभिमान दिसून येतो.
रिताभरीने केलेल्या शूटचे काही क्षण शेअर करताना तिच्या सोशल मीडिया पोस्टला कॅप्शन दिले, "फॅशन माने रोग किंबा मोटा ना - फॅशन मानने निजके सुंदर कोरे सजनो" याचाच अर्थ - "फॅशन म्हणजे आजार किंवा लठ्ठपणा नाही - फॅशन म्हणजे स्वतःला सजवणे".
रिताभरी सर्व स्तरांवरील स्त्रियांना प्रेरणा देताना दिसते. तुम्ही लठ्ठ असाल किंवा अगदी सडपातळ, या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तुम्ही जसे आहात तसे खूप सुंदर आहात आणि यात लाजण्यासारके काही नाही, असा संदेश ती देते.
अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीचा 'फटाफटी' हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होत आहे. फटाफाटी ही माझी कथा आणि तुमची कथा असल्याचे ती सांगते. अनेक स्तरांवरील स्त्रिया तिला प्रोत्साहन देतात, असे मतही तिने व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
रिताभरीचा बॉडी पॉझिटिव्हीटीचा दृष्टिकोन बिनधास्त आहे. तिने केलेल्या खास शूटमध्ये विविध प्रकारच्या शरीरयष्टीतील महिला दिसून येतात. तिचा आगामी चित्रपट काहीसा याच अनुषंगांवर आधारित असल्याने तिने हे शूट केले आहे. शूटमधील मॉडेल्सचे स्ट्रेच मार्क्स, त्वचेचे भिन्न रंग आणि ते झाकण्यासाठी केलेली रंगरंगोटी आणि साज आपण फोटोजमधून पाहू शकता.
फटाफाटी ही एक लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी यांनी केले आहे. रिताभरी ही प्रथमच अबीर चॅटर्जीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्वस्तिका दत्ता या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. कथा आणि पटकथा झिनिया सेन यांची आहे आणि संवाद साम्राग्नी बंदोपाध्याय यांनी दिले आहेत. फटाफटी हा रिताभरीचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.