Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील वेपन रिपोर्ट समोर, सरपंचांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा
Santosh Deshmukh Case:चार विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाली असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चापकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चापकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती. या हत्यारांचा परीक्षण अहवाल आता समोर आला आहे.चार विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाली असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चापकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती, चार हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचं अहवालात नमूद आलं आहे.
चारीही विशेष हत्यारही कराड गॅंगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख करण्यात आलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरावरती एकूण 150 जखमा आढळल्या होत्या. आरोपींनी या आधी देखील इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केली, असेही उघड झालं आहे. या हत्यारांनी जर मारहाण झाली तर मृत्यू होऊ शकतो असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेली चार हत्यार यांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे. यामध्ये गॅस पाईप, पाईपचा चाबूक, बांबूची काठी, लोखंडी पाईप या हत्याराने देखील देशमुख यांना मारहाण केली होती, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्यारांचा परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती आलेला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आले आहे की, जर या हत्याराने एखाद्याला मारहाण झाली तर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे आणि याच हत्याराने देशमुख यांना मारहाण झालेली होती. या मारहाणी मध्ये जवळपास 150 हून अधिक जखमा संतोष देशमुख यांच्या अंगावरती आढळून आला होत्या. या संपूर्ण बाबींचा रिपोर्ट आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे तपास यंत्रणेने या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे दिसून आले.
























