एक्स्प्लोर

संतोष देशमुख प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी; आरोपींची चार्जफ्रेम लागणार? धनंजय देशमुख म्हणाले..

या मागणीवर आज आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीला गैरहजर आहेत.

Santosh Deshmukh case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज ( 19 मे) बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे . या सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित झाले आहेत . आज चार्ज फ्रेम झाली पाहिजे ; आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी धनंजय देशमुख यांच्या वकिलांनी केली असून त्यावर आज सुनावणी होईल . 2 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना ज्या मागण्या दिल्या होत्या त्यावर अद्याप कारवाई झालेली नसून संतोष देशमुख यांची  अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे .आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे .

 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती . या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच  महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून अजूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे . मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींवर चार्ज फ्रेम झाली पाहिजे.या मागणीवर आज आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.आरोपी विष्णू चाटे याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तीचा दावा केला होता. आज विष्णू चाटेच्या वकिलाने हा अर्ज मागे घेतला आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीला गैरहजर आहेत. न्यायालयात सरकारी वकिल काय युक्तीवाद करतात? मागील सुनावणीच्या वेळी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून न्यायालयात डिस्चार्ज एप्लीकेशन करण्यात आले होते. त्यावर काय निर्णय होतो हे पाहणंही महत्वाचं राहणार आहे..

धनंजय देशमुख काय म्हणाले ?

संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली . यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी व देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे . आज चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे .मागच्या वेळेस कोर्ट रजेवर असल्यामुळे ती तारीख पुढे दिलेली  . ती तारीख आज आहे .  आरोपींच्या वकिलांनी काही एप्लीकेशन दिलेले आहेत त्यावर आज सुनावणी होईल . 

दरम्यान परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील .आरोपींना अभय दिले जात असून सुडाची भावना ठेवली जात आहे . आरोपीचे फोटो कुणासोबत आहे. हे दिसत असून प्रत्यक्षात कारवाई झाली पाहिजे.. तर बीड मधील जेलच्या सीसीटीव्हीची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.  

हेही वाचा:

Ajit Pawar: अजित दादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्यावरून सुनावले खडे बोल 

महत्त्वाच्या बातम्या

प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget