एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा राजकीय पक्षांना दणका; बीडमध्ये ठाकरे गटाच्या 36 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Maratha Reservation : बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत मराठा आरक्षणाला आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे. 

बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता याचा फटका राजकीय पक्षांना देखील बसतांना पाहायला मिळत आहे. कालच खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असतांना, आज बीड (Beed) जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत मराठा आरक्षणाला आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाच्या तालुकाप्रमुखासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. त्यानंतर थोरात यांच्यासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे. 

आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.

29 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन युवा सेना, शिवसेना, वाहतुक सेना पदाधिकाऱ्यांनी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी अन्नपाणी त्यागून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्याचे एकमताने ठरले. तसेच युवासेना तालुकाप्रमुख, वाहतुक सेना तालुकाप्रमुख, युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, शाखाप्रमुख असे एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथील बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले. 

यांनी दिले राजीनामे... 

युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर बोबडे, के बबलु इंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख पप्पु ढगे, अनिरुद्धा मुळे, अमोल चौधरी, राहुल जाधव, विशाल गायकवाड, चंद्रकांत चटप, शिवाजी थोरात, सुरज सौंदणे, नंदकिशोर चौधरी, प्रदीप काळे, सागर जाधव, परमेश्वर साखरे, विश्वास राऊत, लखन सौंदणे, सतिश अंबाड, सुरज चौधरी, विशाल अंबाड, दिपक करपे, आकाश चटप, किशोर जाधव, सागर जाधव, शिवाजी बोबडे, स्वप्निल थोरात, ज्ञानेश्वर बोराडे, शरद इंगळे, सुनिल बप्पा जाधव, भाऊ शिंदे, कचरु थोरात, अशोक थोरात, सतिश कोकाटे, आदित्य कोटुळे, शाम गव्हाणे, विजय बोबडे, संतोष बोबडे, विठ्ठल बोबडे, नवनाथ क्षीरसागरसह पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वेच्छेने राजीनामे दिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षण पेटलं! मराठवाड्यात 12 बस फोडल्या, आष्टीत तहसीलदाराची गाडी पेटवली

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget