एक्स्प्लोर

मोठी बातमी! मराठ आंदोलकांनी बीडमध्ये भाजप नेत्याचा कार्यक्रम बंद पाडला, जोरदार घोषणाबाजी

Maratha  Protestors  Aggressive : आरक्षण मिळेपर्यंत गावात एकही राजकीय कार्यक्रम होऊ न देण्याची आंदोलकांची भूमिका घेतली आहे. 

Maratha  Protestors  Aggressive : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून राज्यभराचा दौरा केला असून, दुसरीकडे याच मागणीसाठी मराठा आंदोलक (Maratha Protestors) आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना मराठा आंदोलक जाब विचारतांना दिसत आहे. बीड (Beed) जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. आरक्षण मिळेपर्यंत गावात एकही राजकीय कार्यक्रम होऊ न देण्याची आंदोलकांची भूमिका आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते. यावेळी हा कार्यक्रम सुरू असताना मराठा आंदोलक तिथे पोहचले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठ आंदोलकांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मराठा आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता कार्यक्रम त्वरित बंद करण्यात आला. 

जरांगेंच्या एसआयटी चौकशीवरून मराठा आंदोलक आक्रमक...

बीडच्या निमगाव चोभा या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयात भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम सुरू होता. हा राजकीय कार्यक्रम असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाल्यावर ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची आदेश दिले असल्याने, मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या पक्षाचा एकही कार्यक्रम गावात होऊ देणार नसल्याची भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.

भाजप नेत्यांवर मराठा आंदोलकांच रोष...

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीवरून राज्यभरातील मराठा समाजात रोष पाहायला मिळत आहे. यावरून सर्वत्र तीव्र नाराजी पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका भाजप नेत्यांना बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चांगेफळ या गावात लग्न सोहळ्यासाठी आले असतांना चिखलीकर यांना मराठा आंदोलकांनी अडवत जाब विचारल्याची घटना 4 मार्च रोजी समोर आली होती. तसेच, "सामान्य गरीब जरांगे पाटील यांची कशामुळे एसआयटी चौकशी करता असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या : 

मराठा आंदोलक आक्रमक, चिखलीकरांचा ताफा अडवला; आदर्श घोटाळ्याचीही एसआयटी लावण्याची केली मागणी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget